24 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेषमोदी सरकार हेच जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार

मोदी सरकार हेच जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार

सर्वेक्षणात जनतेने केले शिक्कामोर्तब

Google News Follow

Related

मार्केट रिसर्च फर्म इप्सॉस ग्लोबल ट्रस्ट मॉनिटरने जगातील २१ अव्वल देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे . या २१ देशांतील लोकांचा त्यांच्या सरकारवर किती विश्वास आहे हे जाणून घेणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. या सर्वेक्षणात भारतातील जनतेने त्यांच्या सरकारवर सर्वाधिक विश्वास व्यक्त केला आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे जगातील सर्वात विश्वासार्ह सरकार म्हणून जनतेने या सर्वेक्षणात शिक्कामोर्तब केले आहे.

खरे तर देशासमोरील संकट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने हाताळले आहे, ते कुणापासून लपलेले नाही. त्यामुळेच मोदी असतील तरच ते शक्य आहे, असे आजही जनतेला वाटते. अशा प्रकारचा विश्वास केवळ भारत देशानेच नव्हे तर इतर अनेक देशांतील जनतेनेही व्यक्त केला आहे. सर्वेक्षणासाठी, फर्मने कॅनडा, दक्षिण आफ्रिका, तुर्की आणि युनायटेड स्टेट्ससह २१ देशांतील लोकांशी बोलले. दरम्यान, बहुतेक देशांमध्ये १६ ते ७४ वयोगटातील लोकांना त्यांच्या सरकारबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले. या सर्वेक्षणात बहुतांश शहरी लोकांनी सहभाग घेतला.

सर्वेक्षणानुसार, ५२ % लोकांनी भारत सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. त्याच बरोबर आयटी कंपन्या (५७%), ऊर्जा (५७%), आणि बँकिंग सेवा (५७%) सह सर्वात विश्वासार्ह क्षेत्र म्हणून उदयास आले. इप्सॉस इंडियाचे सीईओ अमित अडारकर म्हणाले, “इंटरनेटवरील लोक आयटी कंपन्यांवर सर्वाधिक विश्वास ठेवतात. त्यापाठोपाठ ऊर्जा, बँकिंग, रिटेल, वित्त क्षेत्र, फार्मास्युटिकल्स, पॅकेज्ड वस्तू, तेल आणि वायू कंपन्यांचा क्रमांक लागतो. तथापि, सोशल मीडिया कंपन्या, तेल आणि वायू कंपन्यांवर लोकांचा कमी विश्वास असल्याचा या सर्वेक्षणात उल्लेख करण्यात आला आहे.

विश्वासार्हता , कामकाज पारदर्शकता, जबाबदार वर्तन महत्वाचे घटक
शहरी भारतीयांसाठी, एखाद्या संस्थेच्या विश्वासाच्या मुख्य बॅरोमीटरमध्ये तिच्या कामकाजाबाबत पारदर्शकता (३३%), टिकाऊपणा (३३%), जबाबदार वर्तन (२९%) यांचा समावेश होतो. जागतिक नागरिकांसाठी, विश्वासार्हता (३६%), त्याच्या कामकाजाबाबत पारदर्शकता (३५%), आणि जबाबदार वर्तन (३१%) हे सर्वात जास्त महत्त्वाचे घटक होते, असे सर्वेक्षणात दिसून आले.

हे ही वाचा:

सावरकरांबद्दल काँग्रेसकडून पुन्हा अभद्र टिप्पणी, उद्धव ठाकरे काय करणार?

मागून आलेल्या बसने धडक दिल्याने पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू

उधमपूरमध्ये पूल कोसळून ८० पेक्षा जास्त जखमी

अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे

लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत अव्वल
पॉलिटिकल इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणतही ७८ % रेटिंग मिळवत पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वाधिक लोकप्रिय जागतिक नेत्यांच्या यादीत अव्वल ठरले होते. २२ देशांमधील त्यांच्या रेटिंगवर आधारित जागतिक नेत्यांच्या यादीत पंतप्रधान मोदींनंतर मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, स्विस राष्ट्राध्यक्ष अलेन बेर्सेट आणि इतरांचा क्रमांकआहे यूएस स्थित सल्लागार कंपनी ‘मॉर्निंग कन्सल्ट’ च्या सर्वेक्षणानुसार मोदींना ७८ टक्क्यांच्या मान्यता रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून रेट करण्यात आले आहे. रेटिंगनुसार, पंतप्रधान मोदींचे रेटिंग अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह इतर नेत्यांपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे .

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा