देशातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी भारताचे उपग्रह अहोरात्र कार्यरत असल्याचा विश्वास भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) व्यक्त केला आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, देशातील नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी १० उपग्रह अहोरात्र कार्यरत आहेत. इंफाळ येथील केंद्रीय कृषी विद्यापीठाच्या (सीएयू) पाचव्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना, इस्रो प्रमुखांनी पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या काळात देशाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी इस्रोच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला.
इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की, “तुम्हाला सर्वांना आपल्या शेजाऱ्यांबद्दल माहिती आहे. जर आपल्याला आपल्या देशाची सुरक्षा सुनिश्चित करायची असेल, तर आपल्याला आपल्या उपग्रहांद्वारे सेवा द्यावी लागेल. आपल्याला आपल्या ७,००० किमी समुद्रकिनाऱ्यावरील भागांचे निरीक्षण करावे लागेल. आपल्याला संपूर्ण उत्तर भागाचे सतत निरीक्षण करावे लागेल. उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण ते साध्य करू शकत नाही,” असे व्ही. नारायणन म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि पश्चिम आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागात रात्रीच्या वेळी सुरू असलेल्या गोंधळ आणि सर्व चकमकींनंतर, ११ आणि १२ मे च्या मध्यरात्री या भागात मोठ्या प्रमाणात शांतता होती, असे लष्कराने म्हटले आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील इतर भागात शांतता होती आणि युद्धबंदीच्या उल्लंघनाची कोणतीही घटना घडली नाही. २२ एप्रिल रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी स्थळे उध्वस्त करणाऱ्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने सीमेपलीकडून गोळीबार, तोफखान्याचा जोरदार मारा आणि ड्रोन हल्ल्यांनंतर अलिकडच्या काळात ही पहिली शांत रात्र असल्याचे लष्कराने नमूद केले.
नाभा तुरुंगातून पलायन प्रकरणातील प्रमुख खलिस्तानी दहशतवाद्याला ठोकल्या बेड्या
ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले, पाकचे ३५-४० सैनिक मृत्यूमुखी, पाकची जेटही पाडली!
भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!
रविवारी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, लेफ्टनंट जनरल राजीव घई (महासंचालक लष्करी ऑपरेशन्स), व्हाइस ऑडमिरल एएन प्रमोद (महासंचालक नौदल ऑपरेशन्स) आणि एअर मार्शल ए. के. भारती (महासंचालक हवाई ऑपरेशन्स) यांनी संयुक्तपणे भारताच्या ऑपरेशन सिंदूरचे प्रमुख परिणाम जाहीर केले.







