26 C
Mumbai
Monday, April 6, 2026
घरविशेषभारताची तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन लवकरच नौदलाच्या ताफ्यात

भारताची तिसरी अणु पाणबुडी INS अरिदमन लवकरच नौदलाच्या ताफ्यात

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिले संकेत

Google News Follow

Related

भारताच्या सामरिक शक्तीत आणखी मोठी भर पडणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवार, ३ मार्च रोजी देशाच्या तिसऱ्या स्वदेशी अणु पाणबुडी INS अरिदमनच्या लवकरच कार्यान्वित होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले की, “हे फक्त एक नाव नाही, तर शक्तीचे प्रतीक आहे – ‘अरिदमन’!”

सध्या संरक्षण मंत्री विशाखापट्टणम दौऱ्यावर असून, येथे ते स्वदेशी स्टेल्थ फ्रिगेट INS तारागिरीचे कमिशनिंग करणार आहेत. विशाखापट्टणम हे भारताच्या अणु पाणबुड्यांचे प्रमुख तळ आणि बांधकाम केंद्र मानले जाते. दरम्यान, INS अरिदमनने समुद्री चाचण्यांचा अंतिम टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला असून, लवकरच ती सामरिक बल कमांड (Strategic Forces Command) मध्ये दाखल होणार आहे. यापूर्वी INS अरिहंत (२०१६) आणि INS अरिघात (ऑगस्ट २०२४) भारतीय नौदलात समाविष्ट झाल्या आहेत.

INS अरिदमनमुळे भारताची अणु त्रिस्तरीय प्रतिरोधक क्षमता (न्यूक्लियर ट्रायड) अधिक मजबूत होणार आहे. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली ही पाणबुडी समुद्रातून अणु प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवेल, ज्यामुळे देशाची सुरक्षा अधिक भक्कम होईल. सुमारे ७,००० टन वजनाची ही पाणबुडी आधीच्या मॉडेल्सपेक्षा अधिक प्रगत असून, त्यात सुधारित स्टेल्थ तंत्रज्ञान आणि ध्वनी नियंत्रण (acoustic performance) दिले आहे, ज्यामुळे शत्रूला तिचा शोध घेणे अधिक कठीण होईल. ही पाणबुडी भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांनी विकसित केलेल्या ८३ मेगावॅट क्षमतेच्या प्रेसराइज्ड वॉटर रिअॅक्टर (PWR) वर चालते.

हे ही वाचा:

रशियाकडून अधिक तेल आणि नैसर्गिक वायू पुरवठ्याचा भारताला प्रस्ताव

पाकिस्तानमध्ये डिझेल ५२० आणि पेट्रोल ४५८ रुपये लिटर

अमेरिकन आर्मी चीफ यांना राजीनामा देण्याचे निर्देश! कारण काय?

“संघर्षाच्या निराकरणासाठी मुत्सद्देगिरी, संवादाचा मार्ग व्यवहार्य”

INS अरिदमनची सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तिची क्षेपणास्त्र क्षमता. यात ८ व्हर्टिकल लॉन्च ट्यूब्स आहेत, ज्या INS अरिहंतपेक्षा दुप्पट क्षमता दर्शवतात. ही पाणबुडी ३,५०० किमी रेंजच्या K-4 क्षेपणास्त्रांपासून ते ७५० किमी रेंजच्या K-15 क्षेपणास्त्रांपर्यंत वाहून नेऊ शकते. INS अरिदमनच्या समावेशामुळे भारताला समुद्रात सतत अणु प्रतिरोध (continuous nuclear deterrence) राखता येईल, म्हणजेच कोणत्याही वेळी किमान एक अणुशस्त्रसज्ज पाणबुडी समुद्रात तैनात असेल. यापूर्वी नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनीही संकेत दिले होते की, एप्रिल-मे दरम्यान INS अरिदमनचे कमिशनिंग होऊ शकते. त्यांनी डिसेंबर २०२५ मध्ये सांगितले होते की ही पाणबुडी अंतिम चाचणी टप्प्यात पोहोचली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा