25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषसर्वोच्च न्यायालयाच्या ३३ पैकी २१ न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर, किती आहे मालमत्ता?

सर्वोच्च न्यायालयाच्या ३३ पैकी २१ न्यायमूर्तींची संपत्ती जाहीर, किती आहे मालमत्ता?

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक पाऊल उचलत न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली

Google News Follow

Related

सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक पाऊल उचलत न्यायाधीशांच्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली आहे. ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आली आहे. इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या संपत्तीची घोषणा सार्वजनिक झाली आहे. या निर्णयानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि इतर २० न्यायाधीशांची माहिती वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे.

न्यायव्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी १ एप्रिल रोजी फुल कोर्ट मीटिंगमध्ये प्रत्येकाची संपत्ती जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोमवारी ५ मे रोजी रात्री सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवर न्यायालयातील सर्व न्यायमूर्तीची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यापासून सर्वोच्च न्यायालयातील ३३ पैकी २१ न्यायमूर्तीच्या संपत्तीची यादी देण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नावे दक्षिण दिल्लीत २ बीएचके डीडीए फ्लॅट असून कॉमनवेल्थ गेम्स व्हिलेजमध्ये ४ बीएचके फ्लॅट देखील आहे. त्या व्यतिरिक्त गुरगावमध्ये त्यांच्या मुलीसह संयुक्त मालकी असलेल्या फ्लॅटमध्ये त्यांच्या नावे ५६ टक्के हिस्सा आहे. तर, बँकेत ५५ लाख ७५ हजार रुपयांचं फिक्स्ड डिपॉझिट आणि १ कोटी ६ लाख रुपयांचा पीपीएफ आहे. सरन्यायाधीश खन्ना यांच्या नावे हिमाचल प्रदेशमध्ये फाळणी पूर्वी पासूनची त्यांची पिढीजात जमीनदेखील आहे.

हे ही वाचा : 

अखिलेश यादव पुन्हा बरळले

पाकिस्तानचा रक्तदाब वाढला, भारत कधीही हल्ला करेल म्हणत दिला इशारा!

भारत बनेल जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था

भारताची कोंडी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत गेलेल्या पाकसाठी ‘कठीण प्रश्नावली’

तसेच येत्या काही दिवसांत सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारणारे न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या संपत्तीचीही माहिती वेबसाईटवर देण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांच्या नावे बँकेत १९ लाख ६३ हजारांच्या ठेवी तर पीपीएफ खात्यात ६ लाख ५९ हजार रुपये आहेत. याशिवाय अमरावतीमध्ये घर, मुंबई आणि दिल्लीत फ्लॅट अशा मालमत्तेची नोंद आहे. तसेच, १ कोटी ३० लाखांचं कर्ज त्यांच्या नावावर आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा