आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !

२२ मार्च रोजी कोलकाता आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना

आयपीएलच्या १८ व्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर !

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (१६ फेब्रुवारी) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ चे वेळापत्रक जाहीर केले आहे. या स्पर्धेचा हा १८ वा हंगाम असून २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. तर अंतिम सामना २५ मे रोजी ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे.

आयपीएलच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २३ मार्च रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये सामना खेळविला जाणार आहे. ६५ दिवसांत १३ ठिकाणी १० संघांमध्ये एकूण ७४ सामने खेळवले जाणार आहेत.  आयपीएल २०२५ मध्ये, लीग सामने २२ मार्च ते १८ मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर, २० ते २५ मे दरम्यान प्लेऑफ सामने आयोजित केले जातील.

२२ मार्च रोजी बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यातील सामन्यानंतर, डबल हेडर सामना रविवार, २३ मार्च रोजी खेळला जाईल. रविवारी, पहिल्या डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादचा सामना राजस्थान रॉयल्सशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात मुंबई संघ चेन्नईशी सामना करेल. आयपीएल २०२५ मध्ये एकूण १२ डबल हेडर आहेत. डबल हेडरच्या दिवशी, पहिला सामना दुपारी ३:३० वाजता आणि दुसरा सामना संध्याकाळी ७:३० वाजता खेळला जाणार आहे.  लखनौ, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद, विशाखापट्टणम, गुवाहाटी, बेंगळुरू, न्यू चंदीगड, जयपूर, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाळा या ठिकाणी हे सामने खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा : 

‘छावा’ चित्रपटातील संभाजी महाराजांच्या हत्येच्या प्रसंगाने रसिक गलबलले!

कोण कुणाला भेटले यावरून कसे काय राजकारण होऊ शकते?

आंतरधर्मीय विवाह चुकीचा नाही, पण ओळख लपविणे चुकीचे, लव्ह जिहादबाबत कारवाई झालीच पाहिजे!

भारतातील मतदारांची संख्या वाढविण्यासाठी चक्क अमेरिका करत होती, ‘फंडिंग’

आयपीएल २०२५ चे संपूर्ण वेळापत्रक

Exit mobile version