33 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरविशेषदुबईत 17 सप्टेंबरपासून आयपीएल सुरु?

दुबईत 17 सप्टेंबरपासून आयपीएल सुरु?

Google News Follow

Related

इंडियन प्रीमियर लीगच्या चौदाव्या सीझनमधील उर्वरित सामने १७ सप्टेंबरपासून पुन्हा सुरु होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, बीसीसीआयची काल व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली होती. त्या बैठकीत आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचं आयोजन आता संयुक्त अरब अमिरात अर्थात यूएईमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आयपीएलच्या चौदाव्या मोसमावरील अनिश्चिततेचे ढग आता दूर सरले आहेत. शनिवारी आयपीएल २०२१ च्या आयोजनासंदर्भात एक महत्त्वाची बैठक बीसीसीआयनं बोलावली होती. दरम्यान, यंदा आयपीएलचं आयोजन भारतात करण्यात आलं होतं. परंतु, कोरोनाच्या संसर्गामुळे ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आयपीएलच्या चौदाव्या मोसमाची सुरुवात ९ एप्रिलपासून मुंबई आणि चेन्नई संघातील सामन्यापासून झाली होती. सुमारे २५ दिवस ही स्पर्ध यशस्वीरित्या आयोजित करण्यात बीसीसीआयला यश आलं. परंतु संघ अहमदाबाद आणि दिल्ली पोहोचल्यानंतर अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बीसीसीआयने दोन सामने टाळल्यानंतर अखेर ३ मे रोजी चौदावा मोसम स्थगित करण्याचा निर्णय घेतला. चौदाव्या मोसमात साखळी फेरी आणि प्ले ऑफ असे एकूण ६० सामने होते. ही स्पर्ध  स्थगित होईपर्यंत २९ सामने खेळवण्यात आले होते तर आता उर्वरित ३१ सामने यूएईमध्ये खेळवले जातील.

बीसीसीआयने आयपीएल सीजन १४ चे उरलेले सामने खेळवले नसते तर त्यांना सुमारे ३ हजार कोटी रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं असतं. दरम्यान ही स्पर्धा कधीपासून सुरु होणार याच्या तारखा अद्याप जाहीर केलेल्या नाहीत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार १८ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या काळात आयपीएलमधील शिल्लक राहिलेले सामने खेळवण्यात येतील.

आयपीएलचे उरलेले सामने २० ते २२ दिवसांचा वेळापत्रक आखून त्यादरम्यान पूर्ण केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. डबल हेडर स्वरुपात सामन्यांचं आयोजन करण्यावर भर दिला जाणार असून या मार्गानं स्पर्धा लवकरात लवकर संपवण्यात येईल.

हे ही वाचा:

पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

सीबीएसई, आयसीएसई परीक्षा रद्द?

ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि मंत्री मोर्चे काढत होते

इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डानं स्पष्ट केल्यानुसार संघातील महत्त्वाचे खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेट वेळापत्रकानुसारच पुढील गोष्टींना प्राधान्य देतील. त्यामुळं इंग्लंडच्या संघातील जोस बटलर, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो, सॅम करन हे खेळाडू आयपीएलमध्ये पुन्हा सहभागी होऊ शकत नाहीत कारण त्यादरम्यानच त्यांच्या संघाचे सामने पाकिस्तान आणि बांगलादेश या संघांशी होणार आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा