इस्रायल-पॅलेस्टाईनचा संघर्ष दिवसेंदिवस चिघळत आहे परंतु त्याचे पडसाद भारतात देखील पाहायला मिळाले.एकीकडे भारतात राहिलेले इस्रायल नागरिक आपण भारतात अधिक सुरक्षित असल्याचे सांगत आहेत तर दुसरीकडे भारतातील काही विद्यार्थी पॅलेस्टाईनचे समर्थन करत आहेत.उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रविवारी (८ ऑक्टोबर) रोजी शेकडो विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली. यावेळी विद्यार्थ्यांनी धार्मिक घोषणाबाजी करत पायी मोर्चा काढला. विद्यार्थ्यांनी हातात वी स्टँड पॅलेस्टाईन, एएमयू स्टँड विथ पॅलेस्टाईन असे पोस्टर्स आणि बॅनर घेऊन निदर्शने केली.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरू असलेल्या युद्धानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलला पाठिंबा दिला असला तरी दुसरीकडे अलीगढ येथील अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शने केली आहेत. यावेळी एएमयूच्या विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.
पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आलेल्या एएमयूच्या विद्यार्थी पत्रकारांशी संवाद साधताना आंदोलक विद्यार्थ्यांनी सांगितले की, इस्रायल ज्या प्रकारे पॅलेस्टाईनवर अत्याचार करत आहे ते योग्य नाही. ते म्हणाले की, युक्रेनवर हल्ला झाला की देश आणि जग युक्रेनच्या समर्थनात येते, पण आता पॅलेस्टाईनमध्ये संकट उभे असताना कोणीही राजकारणी किंवा इतर समाजाचे गुणगान करणारे लोक गप्प बसले आहेत.
हे ही वाचा:
‘हमासला पृथ्वीवरून नामशेष करू’!
मुंबई पोलीस दलात तीन हजार कंत्राटी पोलीस भरतीला सुरुवात!
खलिस्तानी समर्थक दहशतवाद्यांना घरी ठेवणाऱ्याला कॅनडाचा आश्रय
भारताचा जीडीपी ६.३ टक्के राहण्याची शक्यता
या विद्यार्थ्यांनी सांगितले की, आज पॅलेस्टाईन संकटात आहे, मात्र अलीगड मुस्लिम विद्यापीठ आणि एएमयूचे सर्व विद्यार्थी पॅलेस्टाईनच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत. पॅलेस्टाईनचे लोक स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. त्यांना स्वातंत्र्य दिले जात नाही. पॅलेस्टाईनमध्ये मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे.
पंत्रप्रधान मोदींनीकडून निषेध
इस्रायल सोबत भारताचे संबंध चांगले आहेत.हमासने इस्रायलवर केलेल्या हल्यानंतर फोनवर हमासच्या हल्ल्याची निंदा केली होती.इस्रायल सोबत संबंध चांगले असल्याने मोदींनी इस्रायलचे प्रधानमंत्री नेत्यानाहू यांना फोन करून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता.







