भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्र महासभेच्या (यूएनजीए) ८० व्या अधिवेशनापूर्वी फिलिपिन्सच्या परराष्ट्र मंत्री तेरेसा लाझारो यांची भेट घेतली. फिलिपिन्सचे राष्ट्रपती फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्या अलीकडील भारत दौर्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी संयुक्त राष्ट्र तसेच इंडो-पॅसिफिक प्रदेशात भारत-फिलिपिन्स सहकार्यासंदर्भात चर्चा केली.
परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी सामाजिक माध्यम प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, “न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्र महासभेच्या ८०व्या अधिवेशनाच्या सुरुवातीला फिलिपिन्सच्या परराष्ट्र मंत्री तेरेसा लाझारो यांची भेट घेऊन आनंद झाला. राष्ट्रपती फर्डिनांड आर. मार्कोस ज्युनियर यांच्या अलीकडील भारत दौऱ्यात झालेल्या चर्चेला आम्ही पुढे नेले. तसेच, संयुक्त राष्ट्र आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील सहकार्याबाबतही चर्चा केली. लाझारो यांनीही एक्सवर पोस्ट करून सांगितले की, ही भेट दोन्ही देशांची राजकीय, संरक्षण व सुरक्षा, सागरी क्षेत्र आदींमध्ये सक्रिय सहकार्य वाढविण्यासाठी धोरणात्मक भागीदार म्हणून असलेली बांधिलकी पुन्हा अधोरेखित करते.
हेही वाचा..
ऑपरेशन सिंदूरनंतर सुरू केलेल्या ड्रोन वॉरफेअर स्कूलमधील पहिली बॅच लवकरच होणार पदवीधर
बिहारमध्ये ५ ते १५ नोव्हेंबरदरम्यान तीन टप्प्यात निवडणुकीची शक्यता!
नौशादने ‘आकाश’ बनून केलं लग्न अन् चार मित्रांसह महिलेवर केला सामुहिक बलात्कार
विनापरवानगी मिरवणुकीत “आय लव्ह मोहम्मद”चे नारे; जाब विचारायला गेलेल्या पोलिसांवर हल्ला
याआधी, ऑगस्टच्या सुरुवातीला फिलिपिन्सचे राष्ट्रपती नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावर भारताच्या पाच दिवसीय राजकीय दौर्यावर आले होते. नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये फिलिपिन्सचे राष्ट्रपती मार्कोस ज्युनियर यांच्यासोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी भारत-फिलिपिन्स संबंधांचे कौतुक केले होते आणि दोन्ही देशांना “स्वतःच्या इच्छेने मित्र आणि नियतीने भागीदार” असे संबोधले होते.
त्यांनी हेही अधोरेखित केले की, जरी राजनैतिक संबंध नवे असले तरी दोन्ही देशांतील सांस्कृतिक नाते प्राचीन काळापासून दृढ आहे. फिलिपिन्समधील रामायण “महाराडिया लावना” हा शतकानुशतकांपासून चालत आलेल्या सांस्कृतिक बंधाचा “जिवंत पुरावा” असल्याचेही मोदींनी नमूद केले होते. राष्ट्रपती मार्कोस ज्युनियर यांनी फिलिपिन्समधील चालू संरक्षण आधुनिकीकरण मोहिमेतील वेग, भारताच्या स्वदेशी संरक्षण उद्योगाची वाढती क्षमता आणि भूमिका याबाबत समाधान व्यक्त केले होते. तसेच मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक घडविण्यासाठी भारतासोबत कार्य करण्याची तयारी दर्शविली होती. ब्रह्मोस प्रकल्प याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.







