जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंगांवर दहशतवादी हल्ल्यांचा धोका असल्याचे सूत्रांनी सूचित केले आहे, त्यामुळे सुरक्षा उपाययोजनांमध्ये लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. इंडिया टुडेच्या बातमीनुसार, गुप्तचर माहितीनुसार, गुप्तचर माहितीनुसार, श्रीनगर मध्यवर्ती कारागृह आणि जम्मूमधील कोट भालवाल कारागृह दहशतवाद्यांचे टार्गेट असू शकते. यानंतर कारागृहांमधील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
या कारागृहांमध्ये हाय-प्रोफाइल दहशतवादी आणि त्यांचे साथीदार कैद आहेत. दहशतवादी हल्ल्याचा एएनआयकडून तपास सुरु असून जम्मू-काश्मीरमधील कारागृहांवर दहशतवाद्यांचे लक्ष असल्याचे उघड झाले आहे. कारागृहांवर हल्ला करून कारागृहात कैद असणाऱ्या कैद्यांना बाहेर काढण्याचा दहशतवाद्यांचा प्लान होता.
दरम्यान, कारागृहातील कडक सुरक्षेमुळे हे शक्य नसले तरी खबरदारी म्हणून कारागृहाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) महासंचालकांनी रविवारी (४ मे) श्रीनगरमध्ये सुरक्षा संदर्भात उच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
हे ही वाचा :
“खेलो इंडिया यूथ गेम्स” ला बिहारमध्ये दमदार सुरुवात
६० वर्षांची पाकिस्तानी महिलेचे बंगालमध्ये होते ४५ वर्षे वास्तव्य, केली अटक!
या प्रकरणाचा एएनआयकडून वेगवेगळ्या बाजूने तपास सुरु आहे. जम्मूतील अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु आहे. जंगलातील दहशतवाद्यांचे अड्डे सुरक्षा दलांकडून उध्वस्त केले जात आहेत.







