28 C
Mumbai
Friday, December 19, 2025
घरविशेषजम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!

जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!

देशविरोधी कारवायांच्या आरोपांप्रकरणी बडतर्फीची कारवाई

Google News Follow

Related

पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआय आणि दहशतवादी संघटनांसाठी काम केल्याच्या आरोपांवरून जम्मू काश्मीरच्या चार सरकारी कर्मचाऱ्यांना उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बडतर्फ केले आहे. त्यांच्या विरोधात गुप्तहेर संस्थांनी पुरावे जमा केले होते. दहशतवादाविरोधात शून्य सहानुभूती या ब्रीदवाक्याच्या आधारे उपराज्यपाल सिन्हा यांनी दहशतवादी संघटनांशी संबंधित असल्याप्रकरणी आतापर्यंत ५० हून अधिक कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले आहे.

अब्दुल रहमान डार (कॉन्स्टेबल जम्मू काश्मीर पोलिस), अनायतुल्ला शाह पीरजादा (असिस्टंट लाइनमेन, जलऊर्जा विभाग), गुलाम रसूल भट (कॉन्स्टेबल, जम्मू काश्मीर पोलिस) आणि शबीर अहमद वानी (शिक्षक, स्कूल शिक्षण विभाग) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

१. अब्दुल रेहमान डार – डार हा सन २००२मध्ये जम्मू काश्मीरच्या पोलिसांच्या कार्यकारी शाखेमध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती झाला होता. डार हा पुलवामा जिल्ह्यात दहशतवादी संघटनांसाठी काम करत होता. त्याच शेजारी सज्जाद हुसैन हादेखील संघटनेसाठी काम करत असे. सरकारी कर्मचारी असूनही डार हा सज्जासोबत तयार कपड्यांचा व्यवसाय करत असे. २४ डिसेंबर, २०२०मध्ये शोधमोहिमेदरम्यान पकडण्यात आलेल्या काहींचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांनी चौकशीत डार आणि सज्जादची नावे घेतली होती. चौकशीत डार हा दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांचा पुरवठाही करत असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:

‘पवन कल्याण’ ठरले आंध्रच्या निवडणुकीतले वादळ

ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव

महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची एकजूट

सहानुभूती, संविधान बदलणार, उद्योग पळवल्याचं नरेटिव्ह तयार करण्यात विरोधकांना यश आलं!

२. अनायतुल्ला शाह पीरजादा
बारामुल्ला जलऊर्जा विभागात हेल्पर असणारा पीरजादा प्रतिबंधित दहशतवादी संघटना अल बद्र मुजाहिदीनचा सहकारी आहे. त्याने दहशतवाद्यांची अनेकप्रकारे मदत केली आहे. दहशतवादी संघटनांना आणणे, त्यांची जम्मू काश्मीरमध्ये निवासाची सोय करणे, त्यांना सर्व प्रकारे मदत करणे आणि पोलिसांच्या कारवायांबाबत माहिती देणे, आदी प्रकारची मदत केली आहे.

३. गुलाम रसूल भट
गुलाम रसूल भट सन २०१७पासून बलगाम जिल्ह्याच्या शस्त्रागारात तैनात आहे. तो फुटीरतावादी आणि कट्टरपंथी विचारांचा समर्थक आहे. दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रांच्या देखभाल दुरुस्तीसाठी तांत्रिक साह्य करणे आणि दारुगोळा पुरवणे आदी मदत त्याच्याकडून केली जात असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

४. शबीर अहमद वानी
शबीर अहमद शिक्षण विभागात शिक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र शबीर अहमद प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी संघटनेचा सक्रिय सदस्य आहे. तसेच, कुलगामा क्षेत्रात या संघटनेशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन आणि त्यात आघाडीची भूमिका घेतो. त्याने केवळ स्वतःच्याच क्षेत्रात नव्हे तर, शोपिया आणि अनंतनाग सारख्या शेजारच्या जिल्ह्यातही फुटीरतावाद आणि दहशतवादाला पोषक अशी परिस्थिती निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा