स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे कडवट समर्थक, ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. निष्कलंक आणि राष्ट्रवादी विचाराने भारलेला एक सच्चा पत्रकार काळाच्या पडद्याआड गेला, अशी भावना व्यक्त होत आहे.
अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांनी आपल्या परखड विचारांच्या माध्यमातून हिंदुत्व, सावरकर विचारांचा प्रसार केला. अधोरेखित या त्यांच्या यूट्युब चॅनेलच्या माध्यमातून ते सातत्याने हिंदुत्वविषयक विचारांची परखड मांडणी करत असत. अत्यंत धीरगंभीर अशा बोलण्यातून त्यांनी सोप्या भाषेत अनेक विषय आपल्या श्रोत्यांना, चाहत्यांना समजावून सांगितले. पत्रकार या नात्याने त्यांच्या गाठीशी मोठा अनुभव होता, त्यातून त्यांना अनेक राजकीय नेत्यांशी जवळीक साधता आली होती. त्यामुळे या नेत्यांचे अंतरंगही त्यांनी अनेकवेळा आपल्या युट्यूबवरील व्हीडिओच्या माध्यमातून लोकांसमोर आणले.
हे ही वाचा:
माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचे डीएनए नमुने जुळाले
दलितांचा अपमान करणे हा राजद व काँग्रेसचा नैतिक अधिकार
विश्वविख्यात जगन्नाथ रथयात्रेची तयारी जोरदार
ट्रंप यांनी इराणला काय दिला इशारा ?
संयमी बोलण्यातून ते राजकीय, सामाजिक, इतिहासविषयक विषयांची सुरेख मांडणी करत असत. भरपूर वाचन असल्यामुळे त्यांच्या बोलण्यातून त्याची झलक नियमितपणे पाहायला मिळत असे.अरविंद कुलकर्णी यांच्या युटयूब चॅनेलमध्ये हे स्पष्ट दिसत असे की, त्यांच्या बैठकीच्या स्थानाच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र असे. एवढेच नव्हे तर महाराजांचा इतिहासही त्यांना मुखोद्गत होता. इतिहासाशी संंबंधित एखाद्या विषयावर बोलताना ते विविध संदर्भ देत. त्यातून इतिहासावरील त्यांची मजबूत पकड स्पष्ट होत असे.







