काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त!

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिली माहिती 

काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त!

राज्यातील मशिदींवरील अनधिकृत भोंग्याविरोधात भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या सतत आवाज उठवत आहेत. आतापर्यंत अनेक ठिकाणी भेट देवून अनधिकृत भोंग्याविरोधात आवाज उठवून त्यांनी भोंगे खाली उतरवले आहेत. याच दरम्यान, त्यांच्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. काळाचौकी, भोईवाडा विभागातील मशिदींवरील अनधिकृत भोंगे खाली उतरवण्यात आले आहेत. याबाबत किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत ही माहिती दिली.

“भोंगा मुक्त मुंबई” काळाचौकी, भोईवाडा विभाग १०० टक्के भोंगा मुक्त झाला. ACP भोईवाडा यांनी माहिती अधिकार अंतर्गत उत्तर दिले की, काळाचौकी व भोईवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यात आले, असे किरीट सोमय्या यांनी ट्वीटकरत म्हटले.

योगेश गावडे, जन माहिती अधिकारी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त माटुंगा विभाग (मुंबई, अतिरिक्त कारभार) यांनी याबाबत सर्व माहिती दिली. यामध्ये सोमय्या यांनी बरेच प्रश्न उपस्थित केले होते, ज्यामध्ये हद्दीत येणाऱ्या पोलीस स्टेशनने २०२५ मध्ये कोणत्याही कार्यक्रमासाठी भोंग्याना परवानगी दिली होती का?, हद्दीतील परिसरात किती भोंगे लावले आहेत. पोलीस स्टेशनने किती मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी दिली?, सर्व मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत का?, या प्रश्नांचा समावेश आहे.

हे ही वाचा : 

पश्चिम बंगालात पंतप्रधान मोदी ममतांवर गरजले; “ये तो निर्ममता की सरकार”

मान्सूनमध्ये स्वतःला ठेवा तंदुरुस्त आणि निरोगी

वर्ल्ड कप आधी भारतात येणार ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम;

‘ताम्रजल’ ने करा दिवसाची सुरुवात, ठेवते हृदयाचे आरोग्य

दरम्यान, किरीट सोमय्या यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस विभागाने दिली आणि काळाचौकी, भोईवाडा पोलीस ठाणे परिसरातील सर्व मशिदींवरील भोंगे उतरविल्याचे म्हटले. दरम्यान, ध्वनी प्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास ताकीद देणे बंधनकारक असल्याचे कोर्टाने म्हटले होते. तसेच तक्रारदाराचे नाव जाहीर न करण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या आदेशांतर्गत जर ध्वनीप्रदुषणाविरोधात तक्रार आल्यास तर पहिल्यांदा समज द्या, दुसऱ्यांदा तक्रार आल्यास रुपये ५,००० चा दंड लावा, पुन्हा तक्रार आल्यास भोंगा जप्त करण्यास सांगितले आहे.

Exit mobile version