कर्नाटकच्या चित्रदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी कंटेनर ट्रकला धडक दिल्यानंतर पेटलेल्या बसमधून चार मृतदेह सापडले आहेत. पोलिसांनी कंटेनर ट्रक चालकाचाही मृतदेह ताब्यात घेतला आहे. थमिक तपासात असे समोर आले आहे की बसमधील तीन प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत आणि ते जिवंत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे.
मृतांची संख्या किती याबाबत सुरू असलेल्या संभ्रमावर भाष्य करताना आयजीपी (पूर्व) बी. आर. रविकांत गौडा यांनी सांगितले की बस कंपनीकडून मिळालेल्या यादीनुसार चालक व सहाय्यकासह एकूण ३२ जण बसमध्ये प्रवास करत होते. त्यापैकी २५ जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बसमधून चार मृतदेह सापडले आहेत, तर उर्वरित तीन जणांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. ते म्हणाले की चार प्रवासी आणि ट्रक चालक अशा एकूण पाच जणांचा मृत्यू निश्चित झाला आहे. हे सर्व मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे शक्य होत नाही. त्यामुळे मृतदेह डीएनए प्रोफायलिंग आणि शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. बेपत्ता तीन जणांपैकी एका व्यक्तीचा मोबाईल फोन वाजत आहे, मात्र कॉल उचलला जात नाही; उर्वरित दोन नंबर बंद आहेत. अपघातात मोबाईल हरवले असावेत, अशी शक्यता असून ते जिवंत असतील अशी आम्हाला आशा आहे.
हेही वाचा..
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात
युनूस यांची खुर्ची धोक्यात? बांगलादेशमधील हिंसाचारादरम्यान मंत्रिमंडळात राजीनाम्यांचे सत्र
कर्नाटकमध्ये ट्रकची स्लीपर बसला धडक; आग लागून नऊ प्रवासी दगावले
नवी मुंबई विमानतळ सेवेत दाखल; पहिल्या दिवशी नियोजित १५ उड्डाणे
आयजीपी गौडा यांनी पुढे सांगितले की बसमधून सापडलेल्या चार प्रवाशांची ओळख पटवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे आणि या घटनेशी संबंधित सर्व बाबी पुढील तपासात स्पष्ट केल्या जातील. दरम्यान, अपघातातून वाचलेली ईशा हिची आई नलिनी यांनी बंगळुरूमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांच्या मुलीला शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवले जात आहे. ती बसच्या मागील सीटवर बसलेली होती. धडकेनंतर मागील काच फुटली आणि जीव वाचवण्यासाठी ती खिडकीतून उडी मारून बाहेर पडली.
नलिनी यांनी सांगितले की उडी मारताना तिने बसमध्ये अनेक प्रवासी तडफडताना पाहिले. रक्त पाहून नलिनी हादरून गेल्या आणि रस्त्याच्या कडेला बसल्या. त्यानंतर बसमध्ये स्फोट झाला. पोलिसांच्या माहितीनुसार हा अपघात पहाटे सुमारे २ वाजता झाला, जेव्हा समोरून येणारा ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे दुभाजक ओलांडून बसवर आदळला. या घटनेत ट्रक चालकाचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख कुलदीप अशी झाली आहे. बसला आग लागल्यानंतर अनेक प्रवासी बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि इतर मान्यवरांनी चित्रदुर्ग येथील बस अपघातातील मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.







