जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील अखल भागात सलग पाचव्या दिवशीही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. मंगळवारी (५ ऑगस्ट) सकाळपासून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा दल ड्रोन आणि हेलिकॉप्टरसह सर्व मार्गांचा वापर करत आहेत.
दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील अखल येथील जंगलात अतिरेकी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना शुक्रवारी तेथे घेराव घालून शोध मोहीम सुरू करण्यात आली. अतिरेक्यांनी गोळीबार केल्यानंतर ही मोहीम चकमकीत रूपांतरित झाली ज्यामध्ये दोन अतिरेकी ठार झाले तर किमान दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.
शुक्रवारी संध्याकाळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या सुरुवातीच्या गोळीबारानंतर रात्रीच्या वेळी ही कारवाई थांबवण्यात आली. घेराबंदी आणखी मजबूत करण्यात आली आणि अतिरिक्त सुरक्षा दलांना त्या भागात पाठवण्यात आले. शनिवारी सकाळी पुन्हा गोळीबार सुरू झाला ज्यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (SOG), लष्कराच्या १५ व्या कॉर्प्स आणि CRPF च्या टीम संयुक्तपणे या ऑपरेशनचे नेतृत्व करत आहेत. डीजीपी आणि वरिष्ठ लष्करी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’, ‘ऑपरेशन महादेव’, ‘ऑपरेशन शिवशक्ती’ आणि ‘ऑपरेशन अखल’ मोहीम राबवत सुरक्षा दल दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे.
हे ही वाचा :
महुआ मोईत्रा यांच्या ‘डुक्कर’ या टीकेनंतर, कल्याण बॅनर्जी यांची संतप्त पोस्ट अन राजीनामा!
लाल किल्ल्यात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या ५ बांगलादेशींना अटक!







