23 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषपत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञान वापराचा नवा टप्पा; AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत

पत्रकारिता क्षेत्रात तंत्रज्ञान वापराचा नवा टप्पा; AI अँकरने घेतली मंत्र्यांची मुलाखत

केरळमधील डिजिटल न्यूज मीडियाचा यशस्वी प्रयत्न  

Google News Follow

Related

सध्या AI-आधारित तंत्रज्ञानाचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होताना दिसत आहे. पत्रकारिता क्षेत्रही यात मागे राहिलेले नाही. AI तंत्रज्ञान वापरून आतापर्यंत न्यूज अँकरने बातम्या सांगण्याचे काम केले आहे. मात्र, आता पहिल्यांदाच पत्रकारिता क्षेत्रात प्रथमच AI अँकरने एका मंत्र्याची मुलाखत घेतली आहे.

केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री पी. ए. मुहम्मद रियास यांची एका AI न्यूज अँकरने मुलाखत घेतली आहे. निशा कृष्णन यांनी स्थापन केलेल्या Channeliam.com या डिजिटल न्यूज मीडिया स्टार्ट-अपने ही AI मुलाखत घेण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. केरळमध्ये २०१६ मध्ये या चॅनलचं डिजिटल पोर्टल सुरु झालं होतं. या पोर्टलने AI तंत्रज्ञान वापरून ऐतिहासिक मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन या क्षेत्रात एक नवा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या सीईओ आणि संस्थापक निशा कृष्णन यांनी पत्रकारितेच्या या अभिनव दृष्टिकोनाबद्दल आनंद व्यक्त केला.

AI न्यूज अँकर ‘प्रगती’ AI न्यूज अँकरने केरळचे सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन मंत्री, पी. ए. मुहम्मद रियास यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत केरळमध्ये उदयाला येत असलेलं तंत्रज्ञान आणि रोबोटिक्समधील केरळची प्रगती यासह विविध विषयांवर चर्चा झाली. AI तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून काही काळातच हे तंत्राज्ञान आणि त्याचा वापर अगदी सहज केला जाणार आहे. अनेक बातमी देणाऱ्या चॅनल्सनी या AI तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केलेला आहे.

हे ही वाचा:

बुलेट ट्रेनसाठी १२९.७१ हेक्टर वनजमीन मिळणार

अहमदाबादच्या रुग्णालयात भीषण आग; रुग्णांची झाली पळापळ, पण जीवितहानी नाही

‘मणिपूरमधील संघर्षात परकीयांचा हात असू शकतो’

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

AI अँकर हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता असणारे न्यूज अँकर असतात. हे अँकर बातम्या वाचण्यास आणि प्रसारित करण्यास सक्षम असतात. दिसायला मानवी अँकरसारखे असणारे हे अँकर वेगळे असतात. इतर अँकरच्या तुलनेत AI अँकर हे अधिक वेगवान आणि अचूक असतात. तसेच ते चोवीस तास न थकता काम करु शकतात.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा