26 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरविशेषगुरुवायूर मंदिरात गैर-हिंदू व्लॉगरने तलावात प्रवेश केल्यानंतर शुद्धीकरण विधी राबवली!

गुरुवायूर मंदिरात गैर-हिंदू व्लॉगरने तलावात प्रवेश केल्यानंतर शुद्धीकरण विधी राबवली!

व्लॉगर जास्मिन जाफरने मागितली माफी 

Google News Follow

Related

केरळच्या त्रिशूरमधील प्रसिद्ध गुरुवायूर श्रीकृष्ण मंदिरात एका गैर-हिंदू व्लॉगरने मंदिराच्या तलावात उतरल्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी शुद्धीकरणाची (स्वच्छता) प्रक्रिया राबवली. या घटनेमुळे मंदिर प्रशासन आणि श्रद्धाळूंमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंदिराचे व्यवस्थापक म्हणाले की, बिग बॉसची माजी स्पर्धक आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जास्मिन जाफरचे कृत्य मंदिराच्या रीतिरिवाजांचे उल्लंघन आहे आणि यामुळे तलाव अपवित्र झाले आहे.

यामुळे सकाळी ५ ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शन मर्यादित करण्यात आले आहे, आज दुपारी पुण्यकर्म (शुद्धीकरण विधी) पूर्ण झाल्यानंतरच भाविकांना नालंबलममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या धार्मिक विधींमध्ये सहा दिवसांच्या पूजांचा समावेश असणार आहे. भाविकांना तात्पुरत्या निर्बंधांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्लॉगर मंदिर परिसरातील धार्मिक नियमांची माहिती नसताना तलावात उतरल्याचे समजते. गुरुवायूर मंदिरात केवळ हिंदू भक्तांना प्रवेश दिला जातो आणि धार्मिक परंपरेनुसार, अशा तीर्थस्थळांतील पवित्र ठिकाणी गैर-हिंदू व्यक्तींनी प्रवेश केल्यास शुद्धीकरणाची प्रक्रिया केली जाते.

हे ही वाचा : 

जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी!

भारताची वाटचाल ‘मेक फॉर द वर्ल्ड’ च्या दिशेने

हिमंता बिस्वसर्मांनी केली ३० हजार एकर जमीन अतिक्रमणमुक्त

काँग्रेस आमदार राहुल ममकूटाथिल प्रकरण:”ही शिक्षा नाही, फक्त अंतर्गत तडजोड”

मंदिर व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, त्यांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाणार आहे. सोशल मीडियावर व्लॉगरने पोस्ट केलेल्या व्हिडीओमुळे ही घटना समोर आली असून, त्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्थानिक हिंदू संघटनांनी देखील या प्रकाराचा निषेध करत, मंदिराच्या परंपरा व नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर जास्मिन जाफरने तो व्हिडिओ डिलीट केला आणि निर्बंधांबद्दल तिला माहिती नसल्याचा दावा करत माफी मागितली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा