24 C
Mumbai
Sunday, December 28, 2025
घरविशेषजी-२० परिषद उलथून लावा! खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी काश्मिरी मुस्लिमांना उचकावले

जी-२० परिषद उलथून लावा! खलिस्तानी फुटीरतावाद्यांनी काश्मिरी मुस्लिमांना उचकावले

‘जी २० परिषद उधळून लावा’

Google News Follow

Related

खलिस्तानी फुटीरतावादी आणि बंदी घातलेल्या ‘सिख्स फॉर जस्टिस’ संघटनेचा संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नून यांनी काश्मिरी मुस्लिमांना नवी दिल्लीत होणारी जी२० शिखर परिषद उधळून लावण्यासाठी दिल्लीला जाण्याचे आवाहन करणारा एक ऑडिओ संदेश जाहीर केला आहे.

 

नवी दिल्लीत ९ आणि १० सप्टेंबर रोजी दोन दिवसीय शिखर परिषद होणार आहे. पन्नून यांनी शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर लोकांना प्रगती मैदानाकडे कूच करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर खलिस्तानी ध्वज फडकवण्याची धमकीही दिली आहे.

 

 

 

नुकतेच, दिल्लीतील अनेक मेट्रो स्थानकांवर खलिस्तान समर्थक घोषणा चितारण्यात आल्या होत्या. भारतविरोधी घोषणा दिल्याप्रकरणी पोलिसांनी या संघटनेशी संबंधित दोन जणांना अटकही केली आहे. गुरुपतवंत सिंग पन्नू याच्या सांगण्यावरून या भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्या होत्या, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंजाबी बाग, शिवाजी पार्क, मादीपूर आदी मेट्रो स्थानकांच्या भिंतींवर ‘दिल्ली बनेगा खलिस्तान’ आणि ‘खलिस्तान सार्वमत जिंदाबाद’ अशा घोषणा काळ्या रंगात रंगवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी ऑन ड्युटी; नऊ वर्षात एकही सुट्टी नाही

चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन सांगणारा आवाज हरपला

६८व्या वर्षी प्रख्यात वकील हरीश साळवे तिसऱ्या विवाहबंधनात

‘वंदे भारत’ चीन सीमेपर्यंत धावणार

पन्नूनच्या या ऑडिओ संदेशामुळे त्याचा आयएसआय आणि त्याच्या के२ (काश्मीर-खलिस्तान) अजेंडाशी असलेला संबंध उघड झाला आहे, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्लीत होणाऱ्या जी २० शिखर परिषदेत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन वगळता जी २० मधील अन्य जागतिक नेते सहभागी होणार आहेत.

 

 

भारतात पहिल्यांदाच जी २० परिषद होणार असल्याने भारतासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. त्यामुळे नवी दिल्लीत सध्या कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. कोणतीही घुसखोरी, दहशतवादी कृत्य किंवा तोडफोड होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी सुमारे एक लाख ३० हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कार्यक्रमाच्या ठिकाणच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची हलगर्जी होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणेकडून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचाही वापर केला जाणार आहे

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा