27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषIPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

IPL 2021: अंतिम फेरीत चेन्नईला कोलकाता भिडणार

Google News Follow

Related

आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स नाही. दिल्ली कॅपिटल संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. पण हा सामना जिंकताना कोलकाता संघाची पूर्वीच दमछाक झाली. १३६ गावांचे छोटे लक्ष्य साध्य करतानाही दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलकाता संघाला फेस आणला.

शारजा क्रिकेट स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत कोलकाता संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. खेळपट्टी बघता कोलकाताचा हा निर्णय योग्य होता आणि त्यांच्या गोलंदाजांनी ते सिद्ध देखील केले. २० षटकांत दिल्लीचा संघ धावफलकावर केवळ १३५ धावा चढवू शकला. कोलकाताचे गोलंदाज पाच पेक्षा अधिक विकेट घेऊ शकले नाहीत, तरीही त्यांनी धावा देण्याच्या बाबतीत मात्र खूप कंजुषी केली. शिखर धवन (३६) आणि श्रेयस अय्यर (नाबाद ३०) या दोघांचा अपवाद वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

हे ही वाचा:

…कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भ्रष्टाचाराबद्दल काँग्रेसचेच नेते कुजबुजले

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

राजस्थानमधील काँग्रेसचे मंत्री म्हणाले, महिला कर्मचारी म्हणजे डोकेदुखी!

मोदी सरकारच्या योजना मानवाधिकारांचं जतन करणाऱ्या

१३६ धावांचे विजयी लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून कोलकाताचे फलंदाज मैदानावर उतरले. त्यांचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५५) आणि शुभमन गिल (४६) यांनी त्यांना चांगली सुरुवात देखील करून दिली. पण पुढे मात्र कोलकात्याचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. कोलकात्याचे चार फलंदाज शून्य धावा करून माघारी परतले. त्यामुळे सामना अंतिम षटकापर्यंत गेला आणि अटीतटीचा होताना दिसला. पण शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठीनी जोरदार षटकार खेचत कोलकाता संघाला अंतिम फेरीत नेले. कोलकाताचा सलामीवीर व्यंकटेश अय्यर याने केलेल्या अर्धशतकी खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित केले गेले.

आता शुक्रवार १५ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या अंतिम सामन्यात कोणता संघ आयपीएल चषकावर आपले नाव कोरतो हे बघणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा