शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होत आहेत! 

अवामी लीगच्या नेत्याने पंतप्रधान मोदींचे मानले आभार 

शेख हसीना पुन्हा पंतप्रधान होत आहेत! 

शेख हसीना लवकरच बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणून परत येतील, असा दावा अवामी लीगचे उपाध्यक्ष आणि बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचे जवळचे सहकारी डॉ. रब्बी आलम यांनी केला आहे. हसीना शेख यांना भारतात आश्रय दिल्यामुळे भारतासह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे त्यांनी आभार मानले आहेत. एएनआयशी संवाद साधताना ते बोलत होते.

डॉ. रब्बी आलम म्हणाले, शेख हसीना पंतप्रधान म्हणून परत येत आहेत. तरुण पिढीने चूक केली आहे, पण ती त्यांची चूक नाही, त्यांना हाताळण्यात आले आहे. गेल्या वर्षी हसीना शेख यांचे सरकार उलथवून टाकणाऱ्या विद्यार्थी उठावाला “दहशतवादी उठाव” असे संबोधून आलम पुढे म्हणाले, “बांगलादेशवर हल्ला होत आहे आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने त्यावर लक्ष देण्याची गरज आहे. राजकीय उठाव ठीक आहे, पण बांगलादेशात असे काही चालले नाही. हा एक दहशतवादी उठाव आहे.

हे ही वाचा : 

‘सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या ईशा फाउंडेशनविरोधातील वादग्रस्त पोस्ट हटवा!’

शिवाजी सावंत यांची ‘छावा’ कादंबरी आता इंग्रजीत !

ताजे काँग्रेसी टूलकिट जोडते, वक्फच्या मनमानीचा विकसित भारताशी संबंध…

पंतप्रधान मोदींनी गंगा तलावाचे घेतले दर्शन

ते पुढे म्हणाले, आमचे अनेक नेते भारतात आश्रय घेत आहेत आणि आम्ही भारत सरकारचे खूप आभारी आहोत. आमच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सुरक्षित प्रवास मार्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील आभार मानतो. आम्ही भारतीय जनतेचे आभारी आहोत.

मुहम्मद युनूस यांना पदावरून हटण्याचे आवाहन करताना आलम म्हणाले, आम्ही बांगलादेश सल्लागारांना पद सोडण्यास आणि जिथून आला होता तिथे परत जाण्यास सांगू इच्छितो. शेख हसीना पंतप्रधान म्हणून परत येत आहेत. तरुण पिढीने चूक केली आहे पण ती त्यांची चूक नाही, त्यांना हाताळण्यात आले आहे, असे डॉ. रब्बी आलम यांनी म्हटले.

Exit mobile version