25 C
Mumbai
Friday, January 23, 2026
घरविशेषलेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!

लेहमधील अशांततेचा लडाख पर्यटनाला फटका!

निदर्शनांमुळे पर्यटकांनी लेह लडाखकडे पाठ फिरवल्याचे चित्र

Google News Follow

Related

लेहमधील अशांततेचा लडाखच्या पर्यटन क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या निदर्शनांमुळे पर्यटकांनी लेह लडाखकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. अनेकांनी आपापल्या योजना रद्द केल्याची माहिती आहे. याशिवाय लेहमध्ये कर्फ्यूसोबतच इंटरनेट आणि मोबाईल सेवा देखील बंद ठेवण्यात आल्या आहेत, यामुळे पर्यटन उद्योगाच्या अडचणीत भर पडली आहे. २४ सप्टेंबरपासून शहरात लागू करण्यात आलेल्या अनिश्चित काळासाठीच्या कर्फ्यूमुळे समस्यांमध्ये भर पडली असून अनेक पर्यटक आता अडकून पडले आहेत.

२४ सप्टेंबर रोजी, संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष राज्याचा दर्जा आणि लडाखला सहाव्या अनुसूचीचा विस्तार देण्याच्या मागणीसाठी होता. निदर्शने वाढत असताना, हिंसाचारात चार लोक ठार झाले आणि १५० हून अधिक जण जखमी झाले. यानंतर लेहमध्ये कर्फ्यूबरोबरच इंटरनेट आणि मोबाईल सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे पर्यटन उद्योगाच्या अडचणीत भर पडली आहे.

गेल्या एका आठवड्यापासून पर्यटकांकडून आगाऊ बुकिंग रद्द करण्याचे काम दररोज सुरू आहे. गेल्या बुधवारपासून शहर बंद असल्याने मालाची कमतरता आहे, असे हॉटेल व्यवस्थापक नसीब सिंग यांनी म्हटले आहे. जवळजवळ एक दशकापासून लेहमध्ये काम करणारे सिंग यांनी पुढे सांगितले की, लेह हा शांत प्रदेश असल्याने, शहरात अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहत आहे.

स्थानिक वाहतूकदार रिग्झिन दोर्जे यांनीही सांगितले की, २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यामुळे पर्यटनाला आधीच फटका बसला आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता आणि त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी तणाव निर्माण झाला होता. पहलगाम घटनेने लडाखमधील पर्यटन क्षेत्राला जवळजवळ ठप्प केले. ऑपरेशन सिंदूरनंतर एका महिन्यानंतर पर्यटक येऊ लागले. पण, आता पुन्हा एकदा या क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

हे ही वाचा : 

भारत आमचा बाप होता आणि नेहमीच राहील…

“देशाचे नेते फ्रंटफूटवर फलंदाजी करतात तेव्हा…” मोदींबद्दल काय म्हणाला सूर्यकुमार?

भारत ते भूतान रेल्वे प्रवास लवकरच! ४,०३३ कोटी रुपयांची गुंतवणूक

“ओवैसी बंधू कोल्हापुरात नकोत”

तैवानमधील पर्यटक शीना यांनी सांगितले की, “येथे आल्यावर मला सर्व काही बंद असल्याचे दिसून आले. मी माझे चलन बदलू शकलो नाही आणि वस्तू खरेदी करू शकलो नाही. मी पँगोंग तलावाच्या आसपास काही ठिकाणी फिरण्याची योजना आखत होतो पण मला परवाना मिळाला नाही.” दिल्लीतील आणखी एका पर्यटकाने सांगितले की, बाजारपेठा बंद असून मोबाईल इंटरनेट सेवाही बंद आहेत. तसेच निर्बंधांमुळे कुठेही जाऊ शकलो नाही आणि आशा आहे की लवकरच सर्व काही ठीक होईल. आम्ही लडाखचे पर्वत आणि मठ पाहण्यासाठी आलो होतो, पण आता आम्ही फक्त आमच्या खोल्यांमध्ये अडकलो आहोत, असे लेहमधील आणखी एका पर्यटकाने सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा