28 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरविशेष‘लापता लेडीज’ चालला ऑस्कर वारीला!

‘लापता लेडीज’ चालला ऑस्कर वारीला!

‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’कडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी अधिकृत प्रवेशिका

Google News Follow

Related

चित्रपट सृष्टीत जागतिक पातळीवर सर्वोच्च आणि मानाचा मानला जाणाऱ्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारतातर्फे ‘लापता लेडीज’ या हिंदी सिनेमाची निवड झाली आहे. दिग्दर्शिका किरण राव यांनी दिग्दर्शित केलेला ‘लापता लेडीज’ हा चित्रपट २०२४ च्या मार्चमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला प्रेक्षकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता.

द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे. त्यामुळे किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. चेन्नई येथील एका कार्यक्रमात, द फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या सदस्यांनी, ९७ व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपट श्रेणीसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशासाठी या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली.

काही दिवसांपूर्वीचं किरण राव यांनी त्यांचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवावा अशी इच्छा व्यक्त केली होती. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना किरण राव म्हणाल्या होत्या की, ‘लपता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सहभागी व्हावा अशी इच्छा आहे. शिवाय सिनेमागृहात हा चित्रपट असताना सामान्य लोकांनीही हा चित्रपट ऑस्करसाठी जावा अशी मागणी केली होती. त्यामुळे ‘लापता लेडीज’ हा सिनेमा ऑस्कर पुरस्कारावर मोहोर उमटवेल का याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.

हे ही वाचा : 

पंजाबमध्ये ट्रेन उलटवण्याचा कट, रुळावर सापडल्या ‘लोखंडी सळ्या’

अमेरिकेत मोदींच्या भाषणादरम्यान श्रोत्यांना काशी मथुरेच्या मंदिरांची आठवण

प्रसादामधील पवित्र्यासाठी तिरुमला येथे ‘महा शांती होमम’चे आयोजन

भारताचा कायापालट करून डिजिटल इंडियाचे नरेंद्र मोदींचे लक्ष्य

‘लापता लेडीज’ सिनेमाचे दिग्दर्शन किरण राव यांनी केले होते. तर आमिर खान याने या चित्रपटाची निर्मिती केली होती. यामध्ये प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव आणि नितांशी गोयल हे मुख्य भूमिकेत होते. आमिर खानच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला हा चौथा चित्रपट आहे ज्याला भारतातून अधिकृत ऑस्कर एन्ट्री मिळाली आहे. २००१ मध्ये रिलीज झालेला ‘लगान’ हा आमिरच्या प्रोडक्शनमध्ये बनलेला पहिला चित्रपट होता, जो भारताने ऑस्करसाठी पाठवला होता. यानंतर त्याचे ‘तारे जमीन पर’ आणि ‘पीपली लाइव्ह’ हे चित्रपटही ऑस्करसाठी पाठवण्यात आले होते. दरम्यान, ‘लगान’ ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट करण्यात यशस्वी ठरला, तर आमिरने निर्मित इतर दोन चित्रपट शॉर्टलिस्ट होऊ शकले नाहीत. आता चौथ्यांदा आमिर खान प्रॉडक्शनला ही संधी मिळाली आहे. त्यामुळे यात यश मिळणार का याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा