27 C
Mumbai
Friday, January 30, 2026
घरविशेषराजकीय नेत्यांकडून अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

राजकीय नेत्यांकडून अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन

विद्या प्रतिष्ठान प्रांगणात भावपूर्ण वातावरण

Google News Follow

Related

अजित पवारांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले असून, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व स्तरांतून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी उसळली आहे. “दादा” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली आहे.

पार्थिव प्रांगणात आणताच परिसरात शोककळा पसरली. पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी कुटुंबीय, आप्तेष्ट आणि सहकारी भावूक झाल्याचे चित्र दिसून आले. विविध पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते यांनीही अंत्यदर्शन घेतले. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत दादांच्या स्मृतींना उजाळा दिला.
हे ही वाचा:
हा निव्वळ अपघात, यात राजकारण नाही

अरिजीत सिंहचा पार्श्वगायनाला रामराम, श्रेया घोषाल यांचा पाठिंबा

अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी होणार अंत्यसंस्कार

सुभाषचंद्र बोस ते अजित पवार: विमान अपघतात मृत्युमुखी पडलेले ‘हे’ भारतातील मोठे नेते

विद्या प्रतिष्ठान प्रांगणात हजारोंचा जनसागर उसळला होता. ग्रामीण भागासह शहरातूनही नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले. “दादा अमर रहे”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. शिस्तबद्ध व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वाहतूक नियंत्रणासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

अजित पवारांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत अंतिम संस्कारांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार हे राज्यातील एक महत्त्वाचे पर्यायी सत्ताकेंद्र होते. बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून आज (२८ जानेवारी) राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अधिकृतरीत्या राज्यभर तीन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज (दि.२८ जानेवारी) आणि उद्या (दि.२९ जानेवारी) पुणे शहर बंद ठेवण्यात येणार असून, उद्या मार्केटयार्डही बंद राहणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा