27 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरविशेषशेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात

शेणापासून बनवलेला रंग चालला परदेशात

Google News Follow

Related

सातारा जिल्ह्यातील कराड येथील उद्योजक सतीश बडे यांनी गायीच्या शेणापासून पर्यावरणपूरक रंग (पेंट) बनवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. गाई वाचवायच्या असतील तर त्यांच्या पासून शेतकऱ्यांना आणि गो शाळांना आर्थिक फायदा होणे गरजेचे असल्याचे लक्षात घेऊन बडे यांनी हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून महिन्याला पाच ते सहा लाखांची उलाढाल होत असून अनेक लोकांना रोजगार प्राप्त झाला आहे. सर्व तपासण्या आणि निकष यशस्वी पूर्ण केलेल्या या रंगला देशभरातून आणि परदेशातून मोठी मागणी आहे.

सतीश बडे यांना सहज गायीच्या शेणापासून रंग निर्मिती करण्याची कल्पना सुचली. त्यांनी अथक प्रयत्न करून आणि जवळपास वर्षभर अभ्यास, संशोधन करून ही रंग निर्मिती केली. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग हाऊस मुंबई येथे रंगाची व्होलाटाईल ऑरगॅनिक कंपाउंड (VOC) टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये या रंगाचा VOC १.९४ आला. VOC जितका कमी तितके उत्पादन चांगले असे समजले जाते. इतर रंगाचे VOC ३० ते ४० असते. त्यानंतर हा रंग वापरल्यास कीटक कमी झाले, शेवाळ कमी झाल्याचे समोर आले. त्यानंतर हा रंग बाजारात विक्रीसाठी आणण्यात आला.

हे ही वाचा:

सुरू झालेल्या शाळेत लसीकरण केंद्र

भारत- पाकिस्तान सीमेजवळ मिग विमानाचा अपघात; विंग कमांडरचा मृत्यू

‘फुकट’ची मारहाण आली अंगलट, पोलीस अधिकारी निलंबित

शुक्रवार मध्यरात्रीपासून राज्यभर नवे निर्बंध; जाणून घ्या!

थोड्याच दिवसात या रंगला पेटंट मिळेल असे बडे यांनी सांगितले. तसेच सध्या भांडवल कमी असून यांत्रिकदृष्ट्या या रंगाची निर्मिती करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांकडून पाच किंवा दहा रुपयाने किलो असे शेण खरेदी केले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळते शिवाय गाईंचे संरक्षण होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा