‘माँ शबरी’ची गायिका मैथिली ठाकूर बिहार भाजपमध्ये प्रवेश करणार!

भाजपा नेते विनोद तावडे अन केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची घेतली होती भेट 

‘माँ शबरी’ची गायिका मैथिली ठाकूर बिहार भाजपमध्ये प्रवेश करणार!

लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर सध्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आहे. त्यांनी त्यांच्या मूळ गाव असलेल्या मधुबनी जिल्ह्यातील बेनिपट्टी येथून राजकीय पदार्पण करण्याचे संकेत दिले आहेत. जुलै महिन्यात २५ वर्षांची झालेल्या ठाकूर यांनी अलीकडेच भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्या भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे.

नर्मदा महोत्सवात बोलताना मैथिली ठाकूर म्हणाल्या, “माझ्या गावाशी माझे विशेष नाते आहे. येथून माझी राजकीय कारकीर्द सुरू करणे मला खूप काही शिकवेल.” दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक ६ आणि ११ नोव्हेंबर २०२५ रोजी दोन टप्प्यांत होणार आहे, तर १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. २४३ सदस्यीय विधानसभेच्या कार्यकाळाची मुदत २२ नोव्हेंबरला संपत आहे.

२५ जुलै २००० रोजी बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बेनीपट्टी भागात जन्मलेल्या मैथिली ठाकूर यांचे बालपण संगीताच्या सान्निध्यात गेले. त्या संगीतप्रेमी कुटुंबात वाढल्या, जिथे वडील रमेश ठाकूर हे स्वतः संगीतकार आहेत आणि आई पूजा ठाकूर ही गृहिणी आहे.

मैथिलीला मोठा भाऊ ऋषभ आणि धाकटा भाऊ अयाची अशी दोन भावंडं आहेत. तिच्या वडिलांसह आजोबांनीही भारतीय शास्त्रीय संगीत आणि लोकगायनाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यामुळे घरातच संगीताचे संस्कार मिळाल्यामुळे, लहानपणापासूनच तिला लोकसंगीताची विशेष आवड निर्माण झाली.

मैथिलीने मैथिली, भोजपुरी आणि हिंदी या भाषांमध्ये गायन सादर केले असून, तिच्या सादरीकरणाने भारतासह परदेशातही मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे. ती आपल्या भावांसोबत आंतरराष्ट्रीय स्तरावरही परफॉर्म करते आणि विविध मंचांवर भारतीय लोकसंगीताचा प्रचार करते.

हे ही वाचा : 

गाझामधील इस्रायली कारवाईविरुद्ध माकपाचे आंदोलन

एआय उत्पादने, सेवा तयार करण्याचे ग्लोबल हब बनण्याची क्षमता

‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित

“गरीबी आणि संघर्ष पेलून बनली भारताची पहलवान”

सोशल मीडियावरही ती अत्यंत सक्रिय आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या प्लॅटफॉर्मवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिच्या पोस्ट्स, गीते आणि थेट सादरीकरणे मोठ्या प्रमाणावर पाहिली जातात. २०२४ मध्ये, मैथिली ठाकूर यांची बिहार राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरपदी नियुक्ती करण्यात आली. ही निवड त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची आणि सामाजिक-सांस्कृतिक प्रभावाची ठळक ओळख ठरली आहे. याशिवाय, संगीत नाटक अकादमीकडून त्यांना प्रतिष्ठित ‘उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार’ देण्यात आला आहे.

मैथिलीच्या कलेचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. अयोध्या मंदिरातील राम लल्ला प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमादरम्यान, मैथिली ठाकूर यांनी सादर केलेल्या रामायणातील भक्तीपर व्यक्तिमत्त्व ‘माँ शबरी’ यांच्यावरील गाण्याच्या भावपूर्ण सादरीकरणाचे पंतप्रधानांनी विशेष उल्लेख करून कौतुक केले.

Exit mobile version