29 C
Mumbai
Sunday, November 9, 2025
घरविशेष‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित

‘या’ संशोधनासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा; तीन शास्त्रज्ञ होणार सन्मानित

पुरस्कार वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी होईल

Google News Follow

Related

भौतिकशास्त्रातील २०२५ सालच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने मंगळवारी नोबेल पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. या वर्षी जॉन क्लार्क, मायकेल एच. डेव्होरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना क्वांटम मेकॅनिक्स टनेलिंगवरील आणि ऊर्जा प्रमाणीकरण अशा (macroscopic quantum mechanical tunnelling and energy quantisation in an electric circuit) त्यांच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात येणार आहे. १० डिसेंबर रोजी एका समारंभात या तिघांनाही हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

ब्रिटिश वंशाचे क्लार्क हे कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे प्राध्यापक आहेत. फ्रान्सचे डेव्होरेट हे येल विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांता बारबरा येथे प्राध्यापक आहेत. मार्टिनिस हे देखील प्राध्यापक आहेत. पुरस्कारांची घोषणा करताना नोबेल समितीने म्हटले आहे की, तिन्ही विजेत्यांनी इलेक्ट्रिकल सर्किट्सवर प्रयोग केले आहेत ज्यामुळे क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम संगणक आणि क्वांटम सेन्सर्ससह क्वांटम तंत्रज्ञानाच्या पुढील पिढीच्या विकासासाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

१९०१ ते २०२४ या काळात ११८ वेळा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. आतापर्यंत २२६ शास्त्रज्ञांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले आहे. गेल्या वर्षी, एआयचे गॉडफादर मानले जाणारे जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन यांना मशीन लर्निंगचा पाया रचण्याच्या त्यांच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

हे ही वाचा : 

”काशीमध्ये हनुमान चालीसा नाही तर अजानही नाही”

दिवाळी होणार गोड! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज

अमेरिकेच्या तिजोरीला लागलेल्या टाळ्याचा फटका हवाई वाहतुकीला

गुजरातमधील द्वारका शहरात पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावणाऱ्याला अटक

यापूर्वी, सोमवारी वैद्यकशास्त्रातील २०२५ सालच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली. मेरी ई ब्रुंको, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची या तीन शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. तिघांनाही परिघीय रोगप्रतिकारक सहनशीलतेशी (peripheral immune tolerance) संबंधित शोधांसाठी नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

रसायनशास्त्रातील बुधवारी आणि साहित्यातील नोबेल विजेत्यांची घोषणा गुरुवारी केली जाईल. शांततेचा नोबेल पुरस्कार शुक्रवारी आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्कार १३ ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. त्यानंतर पुरस्कार वितरण समारंभ १० डिसेंबर रोजी होईल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा