गुजरातमधील द्वारका शहरात मिरवणुकीदरम्यान पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवण्यात आला, आणि त्यावरून मोठा वाद उद्भवला. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एक आरोपीला अटक केली असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, देवभूमी द्वारका जिल्ह्यातील खंभालिया शहरात “अकरावी शरीफ ईद” मिरवणुकीदरम्यान ही वादग्रस्त घटना घडली. सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांना मिरवणुकीत पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावताना दिसले. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
द्वारकात पॅलेस्टाईनचा झेंडा फडकवला
मिळालेल्या माहितीनुसार, अमद अब्दुल रुखदा नावाच्या व्यक्तीने स्वतः हा झेंडा तयार केला होता आणि लहान मुलांकडून तो फडकवून घेतला. इतकेच नाही, तर मिरवणुकीदरम्यान भडकाऊ घोषणा देखील देण्यात आल्या. धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी अशा प्रकारच्या कृत्यामुळे शहरातील शांतता आणि सौहार्द धोक्यात आले.
हे रचलेले कटकारस्थान
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अमद अब्दुल रुखदाने जाणीवपूर्वक विविध धार्मिक आणि प्रादेशिक गटांमध्ये वैर निर्माण करण्याचा कट रचला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खंभालिया पोलिसांनी तातडीने कारवाई केली.
अमद अब्दुल रुखदा याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 196(2) आणि 351(सी) तसेच किशोर न्याय अधिनियम 2016 च्या कलम 83(2) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करून पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
हे ही वाचा:
सरन्यायाधीशांवर बूट फेकणारा वकील म्हणाला- ”कोणताही पश्चाताप नाही”
बलुचमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला; आयईडी स्फोटानंतर सहा डबे घसरले
किरीट सोमय्या यांना “आय लव्ह महादेव” मोहिमेत सहभागी होण्यास मनाई
पार्ट टाईम नेता देशाचे भविष्य घडवू शकत नाही – राम कदम
शांतता राखण्याचे आवाहन
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेशा प्रमाणात खबरदारी घेतली आहे. तसेच त्यांनी इशारा दिला की धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी कोणतीही भडकाऊ कृती सहन केली जाणार नाही. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.







