पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर भाजप नेते दिलीप घोष यांनी जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी सरकार अधिकच अस्वस्थ झाले असून, त्यामुळे त्या अधिक हुकूमशाही प्रवृत्ती दाखवत असल्याचा आरोप घोष यांनी केला आहे. काल (४ सप्टेंबर) पश्चिम बंगाल विधानसभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर केलेल्या मत चोरीचा आरोपावर भाजप नेते दिलीप घोष बोलत होते.
एएनआयशी संवाद साधताना ते म्हणाले, ” ममता बॅनर्जी यांच्याविरोधात बोलले किंवा आंदोलन केले, तर त्यांना तुरुंगात डांबण्याचा प्रयत्न केला जातो. विरोधकांचं कामच सरकारच्या चुका दाखवून देणं आहे. विधानसभेची निर्मिती यासाठीच झाली आहे की आमदारांनी सरकारच्या चुकांवर बोट ठेवावं. पण ममता बॅनर्जी ऐकायलाच तयार नाहीत,” असं दिलीप घोष म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “त्यांना पराभयाची भीती वाटते, म्हणूनच त्या विचार न करता काहीही बोलतात. विरोधकांना निलंबित करणं, त्यांच्यावर हल्ले करणं, हे लोकशाहीत कुठे बसतं?,” असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, गुरुवारी पश्चिम बंगाल विधानसभेत बराच गोंधळ झाला. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेत चोर-चोर अशी घोषणाबाजी केली. ममता बॅनर्जी यांनी स्वतः जोरदार घोषणाबाजी केली. यादरम्यान तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार वाद झाला. गोंधळादरम्यान, सभापतींनी भाजपचे मुख्य प्रतोद शंकर घोष यांना निलंबित केले.
हे ही वाचा :
पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा मुंबई पोलिसांना मिळाला मेसेज!
“B फक्त बिडीच नाही, बुद्धिमत्ताही दर्शवते, जी कॉंग्रेसकडे नाही”
भारतात रेकॉर्डब्रेक पाऊस; आठवड्याभरात ४८% जास्त मारा
“युक्रेनमध्ये निष्पापांचा मृत्यू अस्वीकार्य, संघर्षाचा अंत सर्वांच्या हिताचा”
भाजपचा आरोप आहे की मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून मार्शलनी त्यांच्यावर हल्ला केला, ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी म्हणाले की, ममता बॅनर्जी यांनी मोदी समुदायाला शिवीगाळ केली. त्यांना आता निघून जावे लागेल. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल. दुसरीकडे, विधानसभेत झालेल्या गोंधळानंतर शुभेंदू अधिकारी यांच्यासह पाच भाजप आमदारांना निलंबित करण्यात आले.
#WATCH | North 24 Pargana: On West Bengal CM Mamata Banerjee, BJP leader Dilip Ghosh says, "As the Bengal elections approach, Mamata Banerjee's government is becoming increasingly tense. That is why she is exhibiting more authoritarian tendencies. If anyone speaks against her or… pic.twitter.com/RE39rF1WWn
— ANI (@ANI) September 5, 2025







