मराठी बोलावीच लागेल पण मारहाण चुकीची!

ठाण्यात दुकानदाराला मारहाण प्रकरणी मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया 

मराठी बोलावीच लागेल पण मारहाण चुकीची!

मराठीत बोलण्यास नकार दिल्याबद्दल मीरा रोड येथे एका दुकान मालकाला मारहाण केल्याचा व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रात राजकीय आणि भाषिक वाद निर्माण झाला आहे. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत, ज्यात राज्यमंत्री योगेश कदम यांनीही म्हटले आहे की, “महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल. जर तुम्हाला मराठी येत नसेल, तर तुमचा दृष्टिकोन असा नसावा की तुम्ही मराठी बोलणार नाही… जर महाराष्ट्रात कोणी मराठीचा अनादर केला तर आम्ही आमचे कायदे लागू करू.” तथापि, त्यांनी असेही म्हटले की मारहाण करणे चुकीचे होते, कायदा हातात न घेता त्याऐवजी त्यांनी तक्रार दाखल करायला हवी होती.

नेमका वाद कशामुळे?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही सदस्यांनी मीरा रोड येथील मिठाई दुकानाचे मालक बाबूलाल खिमजी चौधरी (४८) यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांनी हिंदीत उत्तर दिल्यानंतर मारहाण केली आणि हा वाद सुरू झाला. मंगळवारी घडलेली ही घटना व्हिडिओमध्ये कैद झाली आणि ऑनलाइन मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.

दुकानदार चौधरी यांनी पोलिसांना सांगितले की, सकाळी १०.३० च्या सुमारास, मनसेचे चिन्ह असलेले कपडे घातलेले काही लोक त्यांच्या दुकानात घुसले आणि पाणी मागितले. यावेळी दुकानातील कामगारांनी हिंदीत उत्तर दिल्यावर त्यांनी विरोध केला आणि त्यांना शिवीगाळ करण्यात आली. चौधरी यांनी सांगितले की त्यांच्या दुकानातील कामगार इतर राज्यातील आहेत आणि त्यांना मराठी येत नाही, यामुळे आणखी वाद वाढला.

महाराष्ट्रात कोणती भाषा बोलली जाते असे विचारले चौधरी यांनी उत्तर दिले की सर्व भाषा बोलल्या जातात. या प्रतिसादामुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली आणि घटनेचे चित्रीकरण केले. दरम्यान, काशिमीरा पोलिस ठाण्यात सात अज्ञात लोकांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?

लखनौमध्ये १५ जणांनी इस्लाम सोडून स्वीकारला ‘हिंदू धर्म’

दोन तज्ज्ञांचा बळी घेणारे ते पाशवी हात कोणाचे?

आपली मैत्री घानाच्या अननसाहूनही गोड

मनसेकडून कारवाईचे समर्थन , ‘अहंकारी’ वृत्तीचा आरोप केला

मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने या संघर्षाचे समर्थन करताना म्हटले की, त्यांचे कार्यकर्ते राज्य सरकारने भाषा धोरणाचा ठराव मागे घेतल्याचा आनंद साजरा करत होते आणि त्याचवेळी दुकानात पाणी विकत घेण्यासाठी गेले होते. “मालक अहंकारी होता आणि म्हणाला की महाराष्ट्रात सर्व भाषा बोलल्या जातात. त्यामुळे वाद सुरू झाला.”

Exit mobile version