27.5 C
Mumbai
Monday, July 14, 2025
घरविशेषमहात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?

महात्मा फुले जन आरोग्य आणि आयुष्यमान भारत योजनेची रुग्णालय संख्या कधी वाढवणार?

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांचा सवाल 

Google News Follow

Related

गुरुवारी (३ जुलै) विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी आमदार अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सत्रादरम्यान अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर लक्षवेधी प्रश्न उपस्थित केले. “महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्यातल्या रुग्णालयांची संख्या आपण वाढवण्याच्या प्रयत्नात आहात आणि हे कधी पर्यंत वाढणार?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

यावेळी त्यांनी एका महत्त्वाच्या बाबीवर सभागृहाचे लक्ष केंद्रित करत सवाल केला की, “मुंबई शहर व उपनगरात या दोन आरोग्य योजनांमध्ये अंतर्भूत रुग्णालयांची संख्या कमी आहे. या संदर्भातल्या किंमती राज्य सरकार आणि केंद्र सरकार ने ठरवलेल्या आहेत त्या अत्यंत स्पर्धात्मक आहेत, ही चांगली गोष्ट असली तरीही त्या मुंबईसारख्या शहराच्या रुग्णालयांना परवडणाऱ्या किंमती नाहीत. त्यामुळे रुग्णालय या योजनेत यायला टाळाटाळ करतात. त्याकरिता उपाययोजना करुन रुग्णालयांना या योजनेत आणण्यासाठी सरकार किती गती देणार आहे?”

याव्यतिरिक्त अतुल भातखळकरांनी “धर्मादाय रुग्णालयांमध्ये आरक्षित खाटा असतात त्याचा गरजू रुग्णांना १०० टक्के लाभ मिळावा याकरता शासन प्रयत्न करीत आहे. पण त्यासोबतच महाराष्ट्रातल्या सर्व चॅरिटेबल रुग्णालयाच्या ऑनलाइन डॅशबोर्ड आपण लोकांकरिता उपलब्ध करणार आहोत का?” असा प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले, “आपण सॉफ्टवेअर तयार केलं आणि रुग्णालयांना ते बसवणं सक्तीचं केलं तर खरोखर त्यांच्याकडे किती खाटा रिकाम्या आहेत हे आपल्याला मंत्रालयात बसूनही कळू शकेल. त्यामुळे अशी योजना असेल तर ती कधी पर्यंत अंमलात आणणार?”.

हे ही वाचा : 

आपली मैत्री घानाच्या अननसाहूनही गोड

सीधी बात नो बकवास…

ईसीआयसोबत राजकीय पक्षांची बैठक

जुन्या वाहनांना इंधन देण्यावर का बंदी ?

दरम्यान, भातखळकर यांच्या प्रश्नाला उत्तर देत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितले की, “जी ऑनलाईन व्यवस्था आहे तिची रियलटाईम माहिती देणारा सॉफ्टवेअर आधीच अपलोड केलेला आहे, बहुतांश रुग्णालय याचे पालन करीत आहेत. जी रुग्णालये याचे पालन करत नाही त्यांना आपण नोटीस दिलेली आहे की आपण तात्काळ हे लागू करावे, अन्यथा तुमच्यावर कदम ६६ नुसार कारवाई करण्यात येईल. या संदर्भात आपल्याला अधिक उन्नत टेक्नॉलॉजी वापरता येईल लोकांसाठी रियलटाईम डेटा पब्लिक डोमेनमध्ये ठेवता येईल असे प्रयत्न सुरू आहेत. याव्यतिरिक्त रुग्णालयात आरोग्यदूतही ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.”

त्याचप्रमाणे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सभागृहाला अस्वस्थ केले की, “सर्व चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना सक्तीच्या केल्या जाणार आहेत. याची प्रक्रिया सुरू झालेली आहे बहुतांश रुग्णालयांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. यात काही चॅरिटेबल हॉस्पिटल प्रामाणिकपणे काम करत आहेत त्यांना यात कशा पद्धतीने सुविधा देता येतील हे बघण्याचे काम सुरू आहे. जे रुग्णालय आता नवीन पद्धतीने रजिस्टर होऊ शकतात, जे खऱ्या अर्थाने सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत त्यांना आधीक इन्सेंटिव्ह देऊन कशाप्रकारे या योजना अंतर्भूत करता येईल हा प्रयत्न सुरू आहे.”

याशिवाय जी धर्मादाय रुग्णालये महात्मा ज्योतिराव फुले आणि आयुष्यमान भारत योजनेत फायदा घेत आहेत त्यांची बारकाईने चौकशी करून ज्या तक्रारी यात प्राप्त होतील, त्याची दखल घेण्यासाठी एक तक्रार निवारण विभाग निर्माण करण्यात आला आहे. ज्यावर स्वतः मुख्यमंत्री कार्यालय आणि विधिमंडळ यावरून लक्ष ठेवून आहे. त्यामुळे भविष्यात असे कोणत्याही पद्धतीचे प्रश्न उद्भवले तर त्याची दखल घेऊन त्यावर त्वरित कारवाई केली जाईल असेही राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा