आरजेएमडीएस इंग्लिश स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

आरजेएमडीएस इंग्लिश स्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाति समाज मुंबई संचालित आरजेएमडीएस इंग्लिश स्कुल दहावी मार्च २०२५ मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विदयार्थ्यांचा शाळेतर्फे गौरव समारंभ आयोजित केला होता या समारंभात गुणवंत विदयार्थ्यांचा रोख पारितोषिके व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्याच बरोबर विदयार्थ्यांना मार्गदर्शन करणार्‍या शिक्षकांचा पुष्प व भेटवस्तु देऊन सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीईओ दीपक खानविलकर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे र.जि.म.ज्ञा.स.संस्थेचे कार्याध्यक्ष व आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे चेअरमन सहदेव सावंत उपस्थित होते.आलेल्या पाहूण्यांचे स्वागत मुख्याद्यापिका डींपल दुसाने मॅडमनी केले. सहसचिव यशवंत साटम यांनी मुलांना मार्गदर्शन केले, ९६.६०% मार्क्स मिळवून शाळेतून प्रथम आलेला प्रसाद नारकर, ९३% मार्क्स मिळवून द्वितीय क्रमांक मिळविलेली कुमारी श्रावणी कदम व ९२.८०% मिळवून तृतीय आलेली वैष्णवी धोबी यांचा व त्यांच्या पालकांचा तसेच सर्वच यशस्वी विदयार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

हेही वाचा..

फ्री ट्रेड एग्रीमेंट राष्ट्रीय हितांच्या किंमतीवर होणार नाही

जेव्हा हृदयात स्टेंट लावावा लागला तेव्हा…

जंगल सफारी पर्यटनाला नवी ओळख

ब्राझीलमध्ये गणेश वंदनेने केले पंतप्रधान मोदींचे स्वागत

प्रमुख पाहूणे सहदेव सावंत यांनी विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या व शंभर टक्के शाळेचा निकाल लावल्या बध्दल नर्सरी पासून माध्यमिक पर्यंतच्या सर्व शिक्षक व सेवक वर्गाचे कौतुक केले व आरजेएमडीचा माजी विदयार्थी संघ स्थापन केला आहे,यात आपण सर्व सहभागी व्हावे असे विदयार्थ्यांना आवाहन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री मोतीराम विश्वासराव यांच्या स्नूषा डॉ. सौ.शीतल हेमंत विश्वासराव यांनी प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रसाद नारकर यास रु. ५००१/- चे रोख बक्षीस दिले. तद समयी उपकार्याध्यक्ष श्री. अशोक परब, पर्यवेक्षक आर्या वास्कर अन्य शिक्षक व पालक उत्साहाने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका शीला रोज व कीरण मौर्य यांनी केले.आलेल्या पाहूण्यांचे व पालकांचे आभार प्रायमरीच्या मुख्याद्यापिका शबनम हुल्लूर मॅडमनी मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version