26 C
Mumbai
Thursday, December 11, 2025
घरविशेषएसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार!

एसटी बस अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणार!

राज्यातील शिवशाही बसला अचानक आग लागण्याचे वाढत्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येईल -मंत्री दादाजी भुसे.

Google News Follow

Related

राज्यात एसटी बस अपघातांचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून यासाठी एसटी मार्फत चालक-वाहकांना प्रशिक्षण तसेच वाहनांमधील तांत्रिक दोष दूर करण्यावर भर दिला जात असल्याचे तसेच शिवशाही बसला अचानक आग लागण्याचे वाढत्या प्रमाणावर उपाययोजना करण्यात येईल असे, मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधान परिषदेत सांगितले.

 

विधान परिषद सदस्य भाई जगताप यांनी शिवशाही बसला आग लागण्याच्या आणि अपघात होण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली. यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री भुसे म्हणाले, प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी २०१७-१८ मध्ये शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली.

सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात राज्य परिवहन स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे २४५ अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसेसचे ६० असे एकूण ३०५ अपघात झाले आहेत. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सन २०२३-२४ मध्ये मे २०२३ अखेर स्वमालकीच्या शिवशाही बसेसचे ४७ अपघात झाले असून भाडेतत्वावरील शिवशाही बसेसचे चार असे एकूण ५१ अपघात झाले असून यामध्ये ३ जणांना मृत्यू झाला आहे.

हे ही वाचा:

मन हेलावून टाकणारी घटना; चार महिन्यांचे बाळ नाल्यात वाहून गेलं

सरकारला घटनाबाह्य म्हणणारे उद्धव ठाकरे अजित पवारांच्या भेटीला

जनतेचा एकच पुकार, देशात पुन्हा मोदी सरकार

जगविख्यात मराठमोळे शरीरसौष्ठवपटू आशिष साखरकर यांचे निधन

स्वमालकीच्या शिवशाही बसेसवरील चालकांना शिवशाही बस चालविण्याचे पूर्व प्रशिक्षण दिल्याशिवाय शिवशाही नियतावर कामगिरी देण्यात येऊ नये, अशा सूचना सर्व विभागांना देण्यात आलेल्या आहेत.  बस चालकांना शिवशाही बसचे प्रशिक्षण देण्यासाठी रा.प. मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी येथे रा.प. महामंडळातील सुमारे १०० वाहतूक निरीक्षक (प्रशिक्षण) यांना प्रशिक्षण देण्यात आले असून प्रत्येक विभागातील चार प्रशिक्षीत चालकांमार्फत सर्व विभागातील चालकांना नियमितपणे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देण्यात येत आहे. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी महामंडळाकडुन विविध उपाययोजना नियमितपणे करण्यात येत असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली.

 

 

ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास योजनेचा आतापर्यंत १२ कोटी ८९ लाखांहून प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी एसटी ला ६६२ कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी तिकीट दरात ५० टक्के सवलत योजनेचा १७ कोटी ४२ लाखांहून अधिक प्रवाशांनी लाभ घेतला असून यासाठी ५०५ कोटींची प्रतिपूर्ती करण्यात आल्याची माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली. चालक वाहक आणि कर्मचाऱ्यांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना आरोग्य तपासणीसाठी तीन हजार रूपये, वेतन व भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. ५०० हून अधिक बसस्थानकांचे सुशोभिकरण, स्वच्छता, बांधणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा