आगामी बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. त्रिवेदी म्हणाले, “बिहारच्या निवडणूक लढाईत राहुल गांधी आणि तेजस्वी यादव ‘चोर-चोर’ असा गोंधळ घालत आहेत. पण अलीकडे काही तथ्य समोर आली आहेत ज्यामध्ये त्यांच्यापैकी गुन्ह्यांचा सूत्रधार कोण आहे, हे स्पष्ट होतं.”
त्यांनी पुढे सांगितलं, “ADR (Association for Democratic Reforms) च्या अहवालानुसार, देशातील सर्वाधिक गुन्हेगारी प्रकरणे असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे पहिल्या क्रमांकावर आहेत, तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन दुसऱ्या क्रमांकावर आहेत.”
सुधांशु त्रिवेदी म्हणाले, आज अशी बातमी आली आहे कि कर्नाटकमधील काँग्रेसच्या माजी आमदाराच्या घरातून १२ करोडची रोकड जप्त करण्यात आली. यापूर्वी झारखंडमध्ये ३०० करोडची रोकड जप्त झाली होती. पश्चिम बंगालमध्ये देखील अशीच रोकड जप्त केली गेली आहे. आता हे स्पष्टपणे दिसून येत आहे की त्यांच्यात (विरोधी पक्षात) भ्रष्टाचार्यांना संरक्षण देण्यासाठी इतकी अस्वस्थता का आहे.
हे ही वाचा :
मालाड-मालवणीत बांगलादेशी, रोहिंग्यांची दादागिरी खपवून घेणार नाही
आधारकार्ड नागरिकत्वाचा पुरावा नाही, यावर न्यायालय ठाम का नाही?
दोन पाकिस्तानी महिलांची नावे मतदारयादीत!
मनीषा हत्याकांड : सीबीआय चौकशीस सरकारला काहीही आक्षेप नाही
मी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना विचारू इच्छितो – हेच ते रेवंत रेड्डी आहेत ज्यांनी बिहारच्या DNA ला हीन दर्जाचा म्हटले होते. तसेच त्यांच्याविरुद्ध सर्वाधिक गुन्हे आहेत. आणि तरीही तुमचं त्यांच्यावर इतकं प्रेम का आहे?, असा सवाल त्यांनी केला. भाजप खासदाराने विरोधकांवर त्यांच्या निवडणूक प्रचारात गुन्हेगारांना पाठिंबा देत असल्याचा आरोप केला आणि मतदारांनी त्यांचा खरा चेहरा ओळखावा, असं आवाहन केलं.
#WATCH | Delhi: BJP MP Sudhanshu Trivedi says, "In the upcoming electoral battle of Bihar, Rahul Gandhi and Tejashwi Yadav are shouting 'thief-thief.' Recently, some facts have emerged about who among them has become the kingpin of crimes. ADR has stated in its report that among… pic.twitter.com/hYtCkI8nwN
— ANI (@ANI) August 23, 2025







