26 C
Mumbai
Saturday, January 31, 2026
घरविशेषमोनोरेल ठप्प; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर

मोनोरेल ठप्प; काचा फोडून प्रवाशांना काढले बाहेर

Google News Follow

Related

मुसळधार पावसाने मुंबईचं जनजीवन विस्कळीत झालेलं असतानाच मंगळवारी संध्याकाळी मोनोरेलमध्ये नाट्यमय घटना घडली. सुरुवातीला क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने तिकीट देण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, प्रवाशांच्या मोठ्या गोंधळामुळे प्रशासनाने दबावाखाली तिकीट देण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे मोनोरेलमध्ये गर्दी ओसंडून वाहू लागली. परिणामी, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी झाल्याने मोनोरेल ठप्प पडली आणि अखेर खिडक्यांच्या काचा फोडून प्रवाशांची सुटका करावी लागली. मोनोच्या एका डब्यात साधारण ४०-४५ प्रवासी प्रवास करतात. पण या डब्यात आज ७०—५ प्रवासी प्रवास करत होते. मोनो रेलचे रेस्क्यू ऑपरेशन संपले आहे. एकूण ५८२ लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. कोणतीही जीवित हानी नाही किंवा जखमी नाही.

मोनोरेलमध्ये प्रवाशांची दाट गर्दी
भक्ती पार्क ते चेंबूर दरम्यान धावणारी मोनोरेल मंगळवारी सायंकाळी मैसूर कॉलनी आणि भक्ति पार्क स्थानकांच्या दरम्यान अडकून पडली. तपासात असे निष्पन्न झाले की, मोनोरेलची एकूण क्षमता १०४ टन असताना प्रवाशांच्या गर्दीमुळे वजन तब्बल १०९ टनांपर्यंत पोहोचले. या जास्त वजनामुळे पॉवर रेल आणि करंट कलेक्टर यांच्यातील संपर्क तुटला आणि वीजपुरवठा खंडित झाला.

डब्यातील त्रासदायक परिस्थिती
सुमारे तासभर मोनोरेल अडकून पडली होती. एसी बंद झाल्याने डब्यांमध्ये उकाडा वाढला. दरवाजे बंद असल्याने प्रवाशांचा श्वास घुटमळू लागला. काहींना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने गोंधळ वाढला.

अग्निशमन दलाची धावपळ
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास प्रवाशांनी बीएमसीच्या आपत्कालीन क्रमांकावर मदत मागितली. तत्काळ अग्निशणन दल घटनास्थळी दाखल झाली. तीन स्नोर्कल वाहने, क्रेन आणि बचाव पथकाच्या मदतीने खिडक्यांचे काच फोडून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

एमएमआरडीएचे स्पष्टीकरण
एमएमआरडीएने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
“वीजपुरवठा खंडित झाल्याने मोनोरेल थांबली. टोइंग करणे शक्य नसल्याने फायर ब्रिगेडच्या मदतीने प्रवाशांचा बचाव करण्यात आला. या घटनेची चौकशी केली जाईल.”

मुख्यमंत्री फडणवीसांचा दिलासा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी दिलासा देत म्हटले –
“सर्व प्रवाशांची सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही प्रवाशाने घाबरून जाऊ नये. सर्वांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. चौकशी करून भविष्यातील उपाययोजना केल्या जातील.”

 

 

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा