24 C
Mumbai
Thursday, December 18, 2025
घरविशेषखिचडी घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

खिचडी घोटाळा प्रकरणी सुजित पाटकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

संशयित आरोपीना मिळाले २ कोटी रुपये

Google News Follow

Related

खिचडी घोटाळा प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात सुजित पाटकर यांच्यासह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सहा जणांमध्ये सेवानिवृत्त मनपा अधिकाऱ्याचा समावेश आहे. या खिचडी घोटाळ्यात संशयित आरोपीना २कोटी रुपये मिळाले असा आरोप दाखल करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये करण्यात आला आहे. तसेच सुजित पाटकर याला याला कंत्राट मिळवून देण्यासाठी ४५ लाख देण्यात आले होते.

या प्रकरणातील आरोपींनी स्थलांतरित मजुरांसाठी खिचडी बनवण्याचे कंत्राट बेकायदेशीररीत्या मिळवलेच नाही, तर त्यांनी कराराचे उल्लंघन करून दुसर्‍या संस्थेला उपकंत्राटही दिले असल्याचा आरोप आर्थिक गुन्हे शाखेकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्यात म्हटले आहे. याशिवाय, करारानुसार कंत्राटदाराला प्रत्येकी ३०० ग्रॅम वजनाची पाकिटे तयार करणे आवश्यक होते, परंतु आरोपींकडून १०० ग्रॅम ते २०० ग्रॅम वजनाचे खाद्यपदार्थ दिले, असे पोलिस चौकशीत उघड झाले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदी ऑन ड्युटी; नऊ वर्षात एकही सुट्टी नाही

शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार

‘सनातन धर्म मिटवा’ म्हणणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनला महाराष्ट्रात येण्यास बंदी घाला

सूर्याच्या सर्वात वरच्या ‘करोना’ स्तराचे तापमान २० लाख डिग्री

आरोपींनी मनपाची ६.३ कोटी रुपयांची फसवणूक केली.आर्थिक गुन्हे शाखेने सुनील उर्फ ​​बाळा कदम ,राजू साळुंखे, सुजित पाटकर, संजय राऊत यांचे सहकारी, फोर्सवन मल्टीसर्विसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहल कॅटर्स चे भागीदार, आणि मनपाचे माजी सहाय्यक महापालिका आयुक्त यांचे या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून नाव घेण्यात आले आहे.
आग्रीपाडा पोलिस ठाण्यात या संशयित आरोपीविरुद्ध फसवणूक, विश्वासभंग आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक आता सर्व आरोपींच्या बँक खात्याचे तपशील गोळा करत आहे आणि त्यानंतर ते प्रत्येक आरोपीला त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा