पहलगाम हल्ल्यावेळी ‘अल्लाहु अकबर’ची घोषणा ‘नैसर्गिक’

झिपलाइन ऑपरेटरची NIA कडून चौकशी

पहलगाम हल्ल्यावेळी ‘अल्लाहु अकबर’ची घोषणा ‘नैसर्गिक’

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्याच दिवशी एका पर्यटकाने शूट केलेल्या व्हिडीओत झिपलाइन ऑपरेटर मुजम्मिल तीन वेळा “अल्लाहु अकबर” म्हणताना आढळल्याने, राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने त्याची चौकशी केली आहे. सोमवारी हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पर्यटक ऋषी भट्ट यांनी दावा केला की, झिपलाइन ऑपरेटरने ‘अल्लाहु अकबर’ तीन वेळा म्हटले आणि त्यानंतर गोळीबार सुरू झाला.

NIA च्या सूत्रांनी सांगितले की, मुजम्मिलने “अल्लाहु अकबर” हे शब्द अचानक उच्चारले. हिंदू लोक “हे राम” म्हणतात, त्याचप्रमाणेच हे सामान्य आहे, असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे. प्राथमिक चौकशीत मुजम्मिलच्या जबाबात त्याचा हल्ल्याशी थेट संबंध दिसून आला नाही. मात्र जेव्हा त्याला विचारले गेले की गोळीबार सुरू झाल्यावर त्याने पर्यटकाला झिपलाइनवर का सोडले, तेव्हा त्याचे उत्तर बदलले, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

कौशल्य विकासासाठी भारताचा हे नवे नियोजन

हृदय आणि मेंदूसाठी सर्वोत्तम आहे ‘ॐ’ चा उच्चार !

पाकिस्तानी उच्चायोगाचे कर्मचारी मायदेशी रवाना

आज ‘महाराष्ट्र दिन’; आर्थिक, सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्र अव्वल

कुटुंबीयांचा दावा 

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत मुजम्मिलचा भाऊ मुख्तार म्हणाला, “तो घाबरून पळून गेला. त्याला हल्ल्याबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती.” याबाबत पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) चे प्रवक्ते मोहम्मद इक्बाल त्रंबू यांनी ANI शी बोलताना सांगितले, “काहीही झाले की काश्मिरी लोक ‘अल्लाहु अकबर’ म्हणतात. हा आपला सांस्कृतिक भाग आहे. हे दहशतवादाशी जोडणे चुकीचे आहे. प्रशासन स्वतःच्या अपयशावर पडदा घालण्याचा प्रयत्न करत आहे.”

सध्याची स्थिती:
सुरक्षा यंत्रणा घटनेचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. मुजम्मिलची भूमिकाही अजून तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

Exit mobile version