22 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरविशेष"माझी बॅट भारी... माझे फटके भारी... यामुळेच मी 'यशस्वी'!"

“माझी बॅट भारी… माझे फटके भारी… यामुळेच मी ‘यशस्वी’!”

Google News Follow

Related

आशिया कप २०२५ टी२० फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार असून, स्पर्धेची सुरुवात ९ सप्टेंबरपासून होत आहे. आशियातील या सर्वात मोठ्या क्रिकेट महोत्सवासाठी भारतीय संघाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. मात्र या निवडीच्या तोंडावर मुख्य निवड समितीसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं आहे.

टीम इंडियाचे माजी सलामीवीर आणि लोकप्रिय समालोचक आकाश चोप्राने एक मोठं विधान करताना म्हटलं की, टी२० फॉर्मेटमध्ये यशस्वी जायसवाल हा शुभमन गिलपेक्षा अधिक योग्य पर्याय ठरू शकतो.

चोप्रा आपल्या युट्यूब चॅनेलवर म्हणाला,

“टीममध्ये तिसरा ओपनर ठेवणं गरजेचं आहे. अभिषेक शर्मा किंवा संजू सॅमसन जर फॉर्म गमावला, तर ओपनिंगची जबाबदारी कोण सांभाळणार? विश्वचषकासाठीही तिसरा ओपनर तयार ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे.”

त्याने पुढे सांगितलं की, गिलला सध्या टेस्ट कर्णधार आणि वनडे उपकर्णधार म्हणून जबाबदारी आहे. अशा वेळी त्याला तिसऱ्या ओपनरच्या भूमिकेत ठेवणं योग्य नाही. उलट आकड्यांच्या तुलनेत जायसवाल टीमच्या टी२० डीएनएला अधिक शोभून दिसतो.

🔹 यशस्वी जायसवालचा टी२० रेकॉर्ड:

  • २३ सामन्यातील २२ डावांत ७२३ धावा

  • स्ट्राइक रेट – १६४.३२

  • सर्वाधिक धावसंख्या – १००

🔹 शुभमन गिलचा टी२० रेकॉर्ड:

  • २१ सामन्यांत ५७८ धावा

  • स्ट्राइक रेट – १३९.२८

  • सर्वाधिक धावसंख्या – १२६

या आकडेवारीवरून जायसवाल गिलपेक्षा आघाडीवर असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे १९ ऑगस्टला होणाऱ्या निवड समितीच्या घोषणेत अजीत अगरकरसमोर कठीण निर्णय घेण्याची वेळ येणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा