26 C
Mumbai
Sunday, March 8, 2026
घरविशेषनागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

नागपूर हिंसाचार: विहिंप आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण!

पोलिसांकडून अधिक तपास सुरु 

Google News Follow

Related

नागपूरमध्ये झालेल्या अलीकडील हिंसाचाराच्या संदर्भात विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या आठ कार्यकर्त्यांनी बुधवारी (१९ मार्च) कोतवाली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले. छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी निदर्शने करताना धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपाखाली नागपूर पोलिसांनी विहिंप आणि बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर हे आत्मसमर्पण करण्यात आले.

सोमवारी (१७ मार्च) रात्री उशिरा आरएसएस मुख्यालयापासून फक्त २ किमी अंतरावर असलेल्या महालमध्ये हिंसाचार उसळला. यावेळी मोठ्या प्रमाणात जाळपोळ, दगडफेक आणि पोलिसांवर हल्ले झाले. या हिंसाचारात किमान १० दंगलविरोधी कमांडो, दोन आयपीएस अधिकारी आणि दोन अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. जमावाने दोन जेसीबी मशीन आणि ४० वाहने जाळली, पोलिस व्हॅनची तोडफोड केली. धक्कादायक म्हणजे, दंगले खोरांनी अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग केला. तसेच महिला पोलिसांना शिवीगाळ केली. दरम्यान, यानंतर पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू करत किमान ५० दंगलखोरांना अटक केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या घटनेचा अहवाल मागितला आहे.

हे ही वाचा : 

कानपूरमध्ये पाकिस्तानी एजंट, आयएसआयला देत होता गुप्त माहिती, एटीएसने केली अटक!

लाड करून दंगे कसे थांबतील?

भारत १८ वर्षांनंतर एएफसी बीच सॉकर एशिया कपमध्ये ऐतिहासिक पुनरागमन करण्यास सज्ज

कर्नाटका: महिलांना मोफत गोष्ट देता तर दारू पिणाऱ्याला दोन बाटल्या मोफत द्याव्या!

या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. या प्रकरणात अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टीचा (एमडीपी) स्थानिक नेता फहीम शमीम खान याला अटक केली आहे. या हिंसाचारमागे तो मुख्य सूत्रधार असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दंगली पूर्वी त्याच्या चिथावणीखोर भाषणाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. पोलिसांनी त्याला अटक करत आज न्यायालयात हजर केले असता त्याला २१ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा