31 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणांमधून कणखरतेचे प्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रत्येक भाषणांमधून कणखरतेचे प्रदर्शन

पंतप्रधान झाल्यापासूनची भाषणे गाजली

Google News Follow

Related

भारतीय प्रजासत्ताकाच्या राजकीय परंपरेत लाल किल्ल्याच्या तटावरून पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी केलेले भाषण हे केवळ एक औपचारिक संबोधन नाही, तर ते एका राष्ट्रीय संवादाचे, धोरणात्मक दिशा-निर्देशाचे आणि राष्ट्र-निर्माणाच्या संकल्पनेचे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ आहे. हे भाषण म्हणजे केवळ सरकारच्या वार्षिक कार्याचा अहवाल नसून देशाच्या भविष्यातील वाटचालीचा एक रोडमॅप सादर करते. राष्ट्रीय चेतनेला आकार देते आणि जागतिक समुदायाला भारताच्या भूमिकेबद्दल एक स्पष्ट संदेश देते. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या व्यासपीठावरून पहिले भाषण केले आणि त्यानंतरच्या दशकात, २०२५ पर्यंत, त्यांच्या बारा भाषणांमधून केवळ सरकारच्या योजना आणि उपलब्धी मांडल्या गेल्या नाहीत, तर एका ‘नव्या भारता’ची संकल्पना लोकांसमोर ठेवली गेली. या भाषणांमधून राष्ट्राच्या मानसिकतेत बदल घडवण्याचे, नागरिकांचा आत्मविश्वास वाढवण्याचे, जागतिक दबावाला न जुमानता भारताचे सार्वभौमत्व सिद्ध करण्याचे आणि ‘भारत झुकणार नाही’ (भारत झुकेगा नहीं) ही कणखर वृत्ती दृढ करण्याचे प्रयत्न मोदींनी केले आहेत .
२०१४: ‘प्रधान सेवक’ आणि प्रशासकीय पुनर्रचनेचा पाया
 

आपल्या पहिल्याच भाषणात, पंतप्रधान मोदींनी स्वतःला ‘पंतप्रधान’ म्हणून सादर न करता, “I am present amidst you not as the Prime Minister, but as the Prime Servant” (मी तुमच्यामध्ये पंतप्रधान म्हणून नाही, तर प्रधान सेवक म्हणून उपस्थित आहे), असे म्हटले. या एका वाक्याने त्यांनी शासक आणि शासित यांच्यातील पारंपरिक अंतर कमी करण्याचा आणि सत्तेला सेवेशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी स्वतःला “an outsider for Delhi” (दिल्लीसाठी बाहेरचा माणूस) म्हणून संबोधून, प्रस्थापित व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न केला. ‘स्वच्छ भारत’ अभियानाची घोषणा हे केवळ स्वच्छतेचे आवाहन नव्हते, तर ते राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे आणि प्रत्येक नागरिकाला राष्ट्र-निर्माणात सहभागी करून घेण्याचे एक शक्तिशाली प्रतीक होते.

 

 

२०१५: ‘टीम इंडिया’ आणि जनसहभागाचा उत्सव

‘प्रधान सेवक’ या संकल्पनेला अधिक व्यापक करत, त्यांनी १२५ कोटी भारतीयांना “टीम इंडिया” म्हणून संबोधले. “People’s participation is the biggest strength of democracy” (जनसहभाग ही लोकशाहीची सर्वात मोठी ताकद आहे), असे सांगून त्यांनी विकासाची जबाबदारी सरकारकडून नागरिकांकडे हस्तांतरित केली. याच भाषणात त्यांनी सैनिकांसाठी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेली ‘वन रँक वन पेन्शन’ योजना स्वीकारल्याचे जाहीर केले. या घोषणेने केवळ सैनिकांचे मनोधैर्य वाढवले नाही, तर राष्ट्रीय सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या एका कणखर नेतृत्वाची प्रतिमा तयार झाली. ज्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची आणि आत्मविश्वासाची भावना वाढीस लागली.

 

 

२०१६: ‘सुशासन’ आणि प्रशासकीय क्रांतीचा संकल्प

या वर्षीच्या भाषणाचा केंद्रबिंदू ‘सुशासन’ (Good Governance) हा होता. “Reform, Perform and Transform” (सुधारणा करा, कार्य करा आणि परिवर्तन घडवा) या त्रिसूत्रीद्वारे त्यांनी प्रशासकीय कार्यक्षमतेवर आणि उत्तरदायित्वावर भर दिला. पासपोर्ट मिळवण्यापासून ते कर परताव्यापर्यंतच्या प्रक्रियांमधील सुलभतेची उदाहरणे देऊन, त्यांनी एका संवेदनशील आणि लोकाभिमुख सरकारची मांडली केली. हे भाषण म्हणजे केवळ घोषणांचा पाऊस नव्हता, तर सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवण्याच्या सरकारच्या निर्धाराचे ते प्रतिबिंब होते.

२०१७: ‘न्यू इंडिया’ आणि ‘चलता है’ वृत्तीवर प्रहार

२०२२ पर्यंत, म्हणजेच स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षापर्यंत, ‘न्यू इंडिया’च्या निर्मितीसाठी “संकल्प से सिद्धी” चे आवाहन या भाषणातून करण्यात आले. देशाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडथळा असलेल्या “चलता है (it’s okay attitude)” त्यांनी संपवला. त्या ऐवजी, “बदल सकता है (it can change)” यावर विश्वास ठेवण्याचे आवाहन करून, त्यांनी राष्ट्रीय मानसिकतेत निराशावादाकडून आशावादाकडे एक मोठे स्थित्यंतर घडवण्याचा प्रयत्न केला. जे ‘चलता है’ वृत्ती सोडून देतात, तेच जागतिक स्तरावर कोणत्याही दबावापुढे झुकत नाही.

हे ही वाचा:

दिल्ली देशातील होणाऱ्या विकास क्रांतीची साक्षी

अल्पसंख्यांक संस्थांसाठी नवीन कायदा

साहिबगंजमध्ये अवैध खाणकामावर कारवाई

अजा एकादशी: विष्णू भक्तीने जीवनातील दूर होतील समस्या

२०१८: सामाजिक न्याय आणि आकांक्षांचा भारत

या भाषणात सामाजिक न्यायावर आणि सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करून, त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला, विशेषतः वंचित आणि मागासलेल्या वर्गाला, विकासाच्या प्रक्रियेत समान संधी देण्याची ग्वाही दिली. याच भाषणात २०२२ पर्यंत भारतीयाला अंतराळात पाठवण्याच्या महत्त्वाकांक्षी ‘गगनयान’ मोहिमेची घोषणा करून, त्यांनी देशाच्या वैज्ञानिक प्रगतीवर आणि वाढत्या आकांक्षांवर शिक्कामोर्तब केले.

२०१९: ‘एक राष्ट्र, एक संविधान’ आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश

कलम ३७० आणि ३५-अ रद्द करण्याच्या धाडसी निर्णयानंतर, त्यांनी लाल किल्ल्यावरून “एक राष्ट्र, एक संविधान” या संकल्पनेची पूर्तता झाल्याचे अभिमानाने घोषित केले. हा निर्णय केवळ जम्मू-काश्मीरपुरता मर्यादित नव्हता, तर तो सरदार पटेलांच्या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या स्वप्नाच्या पूर्ततेचे प्रतीक म्हणून सादर करण्यात आला. या निर्णयाने भारताने जगाला दाखवून दिले की, तो आपल्या अंतर्गत सार्वभौमत्वासाठी आणि एकात्मतेसाठी कठोर निर्णय घेण्यास मागेपुढे पाहणार नाही. यासोबतच, ‘जल-जीवन मिशन’सारख्या मोठ्या योजनेची घोषणा करून, त्यांनी विकासाच्या प्रक्रियेला थेट सामान्य माणसाच्या मूलभूत गरजांशी जोडले.

२०२०: ‘आत्मनिर्भर भारत’ आणि जागतिक संकटात संधी

कोविड-१९ महामारीच्या जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी “आत्मनिर्भर भारताचा” मंत्र दिला. आत्मनिर्भरता म्हणजे जगापासून तुटणे नव्हे, तर भारताला जागतिक पुरवठा साखळीचा एक मजबूत आणि विश्वासार्ह भाग बनवणे आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘मेक इन इंडिया’ सोबतच ‘मेक फॉर द वर्ल्ड’ (जगासाठी उत्पादन करा) ही संकल्पना मांडून, त्यांनी भारताच्या जागतिक महत्त्वाकांक्षा आणि क्षमतांवर विश्वास व्यक्त केला. ‘व्होकल फॉर लोकल’चे आवाहन करून, त्यांनी आर्थिक स्वावलंबनाला राष्ट्रीय अभिमानाशी जोडले. आत्मनिर्भरता हाच ‘भारत झुकणार नाही’ या वृत्तीचा आर्थिक पाया आहे, हे यातून स्पष्ट झाले.

२०२१: ‘सबका प्रयास’ आणि ‘अमृत काळा’ची सुरुवात

‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्राला “सबका प्रयास” (सर्वांचे प्रयत्न) ची जोड देऊन, त्यांनी राष्ट्र-निर्माणातील प्रत्येक नागरिकाच्या सक्रिय भूमिकेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित केले. स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंतच्या २५ वर्षांच्या कालावधीला ‘अमृत काळ’ म्हणून घोषित करून, त्यांनी देशासमोर एक दीर्घकालीन आणि महत्त्वाकांक्षी ध्येय ठेवले. हे भाषण म्हणजे केवळ उपलब्धींचा आढावा नव्हता, तर ते भविष्यातील भारताच्या निर्मितीसाठी प्रत्येक नागरिकाला दिलेले एक खुले निमंत्रण होते.

२०२२: ‘पंच प्रण’ आणि गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती

‘अमृत काळा’साठी त्यांनी पाच संकल्प (‘पंच प्रण’) सादर केले. यात ‘विकसित भारत’ आणि ‘नागरिकांचे कर्तव्य’ यासोबतच, “गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती” (removing any trace of colonial mindset) हा एक अत्यंत महत्त्वाचा संकल्प होता. गुलामीच्या मानसिकतेतून बाहेर पडून आणि आपल्या गौरवशाली वारशाचा अभिमान बाळगून नागरीकांनी काम केले तरच देश पुढे जाऊ शकतो, हा संदेश यातून दिला गेला. याच वर्षी प्रथमच लाल किल्ल्यावरून सलामीसाठी “Made in India cannon” (भारतात बनवलेल्या तोफेचा) वापर करण्यात आला, जे आत्मनिर्भरतेचे आणि राष्ट्रीय शौर्याचे एक शक्तिशाली प्रतीक होते.

२०२३: ‘१४० कोटी कुटुंबीय’ आणि सुधारणांची बांधिलकी

देशाला “१४० कोटी कुटुंबीय” (140 crore of my family members) म्हणून संबोधून, मोदी यांनी सामाजिक समरसता, राष्ट्रीय ऐक्य आणि सामूहिक जबाबदारीचा संदेश दिला. त्यांनी ‘जैसे थे’ (status quo) वृत्तीला आव्हान देत, देशाच्या मजबुतीसाठी आणि प्रगतीसाठी सातत्यपूर्ण सुधारणांची प्रक्रिया आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यातून त्यांनी ‘बदल सकते है’ या विचाराला पुन्हा एकदा बळकटी दिली आणि सुधारणा दृढनिश्चयानेच केल्या जातात ही जाणीव जागवली.

२०२४: २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय

गेल्या वर्षीचे पंतप्रधानांचे भाषण भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि जागतिक स्तरावरील दृढ भूमिकेचे प्रतीक होते. वंदे मातरम या मंत्रावर श्रद्धा ठेऊन आपल्या पूर्वजांनी एकजूट होऊन स्वातंत्र्य मिळवले याचे स्मरण करून देऊन त्यांनी नागरिकांना समृद्ध भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. “आज देशासाठी जगण्यासाठी वचनबद्ध होण्याची वेळ आली आहे… जर देशासाठी मरण्याची वचनबद्धता स्वातंत्र्य मिळवू शकते, तर देशासाठी जगण्याची वचनबद्धता भारताला समृद्ध देखील बनवू शकते,” अशा शब्दांमध्ये त्यांनी नागरिकांना प्रेरित केले.

२०२५: आत्मनिर्भरता, राष्ट्रीय सुरक्षा आणि ‘भारत झुकणार नाही’चा स्पष्ट संदेश

या वर्षीचे पंतप्रधानांचे भाषण हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे आणि जागतिक स्तरावरील दृढ भूमिकेचे प्रतीक होते. ‘आत्मनिर्भरते’ला थेट राष्ट्रीय सुरक्षेशी जोडण्यात आले. ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि सिंधू पाणी करारावर कठोर भूमिका मांडून, भारताच्या सार्वभौमत्वाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देण्यात आला. “India will no longer tolerate nuclear blackmail” (भारत आता आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही), हा इशारा देऊन, भारताच्या परराष्ट्र धोरणातील आत्मविश्वासपूर्ण आणि कणखर भूमिकेचे दर्शन घडवले.”blood and water cannot flow together” (रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही), हे विधान भारताच्या राष्ट्रीय हितांप्रति असलेल्या अतूट बांधिलकीचे प्रतीक होते. या भाषणाने ‘भारत झुकणार नाही’ या वृत्तीला स्पष्ट आणि निःसंदिग्ध शब्दात जगासमोर मांडले.

आपल्या सलग बाराव्या आणि १०३ मिनिटांच्या विक्रमी भाषणात, पंतप्रधान मोदींनी ‘विकसित भारत २०४७’ च्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाशी अधिक घट्टपणे जोडले. “एखाद्या राष्ट्राचा खरा अभिमान आत्मनिर्भरतेमध्ये असतो आणि तोच विकसित भारताचा पाया आहे,” असे त्यांनी प्रतिपादन केले. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाचा उल्लेख करून त्यांनी स्पष्ट केले की, “‘मेड इन इंडिया’ची ताकद” असल्यामुळेच भारत असे धाडसी आणि वेगवान निर्णय घेऊ शकला. या भाषणातून त्यांनी संरक्षण, ऊर्जा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरतेसाठी एक नवीन रोडमॅप सादर केला. “मेड-इन-इंडिया जेट इंजिन” बनवण्याचे आवाहन आणि या वर्षाच्या अखेरीस “मेड-इन-इंडिया सेमीकंडक्टर चिप्स” बाजारात येतील ही घोषणा, हे भारताच्या वाढत्या तांत्रिक महत्त्वाकांक्षांचे प्रतीक होते. आर्थिक आघाडीवर, त्यांनी “नेक्स्ट-जनरेशन जीएसटी सुधारणा” आणि तरुणांसाठी एक लाख कोटी रुपयांची “प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना” यांसारख्या मोठ्या घोषणा केल्या. या भाषणाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी प्रथमच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) १०० वर्षांच्या प्रवासाचे कौतुक केले आणि त्याला “जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था” म्हटले. तसेच, घुसखोरीमुळे होणाऱ्या लोकसंख्याशास्त्रीय बदलांच्या धोक्यावर लक्ष वेधत, त्यांनी एका “उच्च-शक्तीच्या लोकसंख्या मिशन” ची घोषणा केली. हे भाषण म्हणजे केवळ मागील दशकाचा आढावा नव्हता, तर ते ‘समृद्ध भारता’च्या निर्मितीसाठी एक स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण आवाहन होते.

भारताची ‘राष्ट्रपुरूष’ म्हणून नवी ओळख आणि कणखर वृत्ती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०१४ ते २०२५ या काळातील लाल किल्ल्यावरून दिलेल्या बारा स्वातंत्र्यदिनाच्या भाषणांचे विश्लेषण केल्यास हे स्पष्ट होते की, ही भाषणे केवळ वार्षिक किंवा प्रासंगिक संबोधने नव्हती. ती एका सुसंगत, दीर्घकालीन आणि सुविचारित वक्तृत्व-प्रकल्पाचा भाग होती, ज्याचा उद्देश एका विशिष्ट ‘नव्या भारता’ची संकल्पना लोकांच्या मनात आणि जागतिक पटलावर स्थापित करणे हा होता. या भाषणांनी केवळ धोरणांची घोषणा केली नाही, तर राष्ट्रीय ओळख, नागरिकत्व आणि जागतिक स्थान यांची पुनर्बांधणी केली. या भाषणांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी भारताला केवळ एक भौगोलिक किंवा राजकीय अस्तित्व म्हणून सादर केले नाही, तर एक सजीव, चैतन्यमय ‘राष्ट्रपुरूष’ म्हणून उभे केले. हा ‘राष्ट्रपुरुष’ भारत केवळ जमिनीचा तुकडा नाही, तर तो एक जिवंत आत्मा आहे. ज्याला हजारो वर्षांचा गौरवशाली वारसा आहे, ज्याला वेदना होतात (उदा. फाळणीच्या जखमा), जो स्वप्ने पाहतो आणि जो आपल्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संकल्प करतो. “भारत माता” हा केवळ एक अलंकारिक शब्दप्रयोग न राहता, तो एका जिवंत अस्तित्वाचे प्रतीक बनतो, ज्याची सेवा करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. “१४० कोटी कुटुंबीय” हा शब्दप्रयोग या राष्ट्रपुरूषाच्या शरीरातील प्रत्येक नागरिकाला एका भावनिक नात्याने जोडतो. या ‘राष्ट्रपुरूष’ भारताला ‘गुलामगिरीच्या मानसिकतेतून’ मुक्त करून, त्याला पुन्हा एकदा ‘विश्वगुरू’च्या स्थानी बसवणे, हे प्रत्येक भाषणाचे अंतिम ध्येय दिसते, असा ‘राष्ट्रपुरूष’ भारत, जो आपल्या अस्तित्वाबद्दल आणि क्षमतेबद्दल जागरूक आहे, तोच ‘भारत झुकणार नाही’ या वृत्तीचे मूर्तिमंत स्वरूप बनतो. ही केवळ एक राजकीय घोषणा नाही, तर ती एका आत्मविश्वासपूर्ण, आत्मनिर्भर आणि आपल्या सार्वभौमत्वासाठी कटिबद्ध असलेल्या राष्ट्राच्या आत्म्याची गर्जना आहे, जी या बारा भाषणांमधून सातत्याने घुमत राहिली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा