नसीरुद्दीन शाह यांचे ‘भारतापेक्षा पाकिस्तानप्रेम मोठं?’

राम कदम यांचा हल्लाबोल

नसीरुद्दीन शाह यांचे ‘भारतापेक्षा पाकिस्तानप्रेम मोठं?’

‘सरदार जी ३’ या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्रीच्या सहभागावरून निर्माण झालेल्या वादात दिलजीत दोसांझच्या समर्थनार्थ उभं राहिल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आमदार राम कदम यांनी त्यांच्या वक्तव्यावर कडाडून टीका केली आहे. राम कदम म्हणाले की, नसीरुद्दीन शाह यांचा सोशल मीडिया पोस्ट ‘हिंदूविरोधी’ आणि ‘अत्यंत असंवेदनशील’ आहे. त्यांचे शब्द कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावणारे असून त्यांनी सार्वजनिकरीत्या माफी मागावी.

बातमीची पार्श्वभूमी अशी आहे की दिलजीत दोसांझच्या ‘सरदार जी ३’ या नव्या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर यांचा सहभाग असल्याने काही ठिकाणी या चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे. मात्र हा चित्रपट भारतात नव्हे तर विदेशात आणि पाकिस्तानमध्ये प्रदर्शित झाला आहे. या प्रकरणावर नसीरुद्दीन शाह यांनी फेसबुकवर लिहिलं होतं की, मी दिलजीतच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ‘जुमला पार्टी’चं डर्टी ट्रिक्स डिपार्टमेंट’ खूप काळपासून त्यांच्यावर हल्ला करण्याची संधी शोधत होतं, आणि त्यांना वाटतं की आता ती संधी मिळाली आहे.”

हेही वाचा..

मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणारे मराठीच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते का?

उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर काँग्रेसचा टाटा-बाय बाय?

उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळले, त्रासही दिला, आता का लाळ ओकताहेत?

नाथन लायन म्हणतो – अजून निवृत्तीचा विचार नाही

ते पुढे लिहितात की, “चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय दिलजीतचा नव्हता, तो दिग्दर्शकाचा होता. पण लोकांना दिग्दर्शक माहित नाही, दिलजीत माहिती आहे, म्हणून सगळा राग त्यांच्यावर काढला जातो. शाह पुढे म्हणाले, “माझे स्वतःचे काही नातेवाईक आणि मित्र पाकिस्तानात राहतात. मला त्यांच्याशी प्रेमाने बोलण्यास किंवा भेटण्यास कोणीही थांबवू शकत नाही. जे लोक मला म्हणतात ‘पाकिस्तान जा’, त्यांना माझं उत्तर आहे – ‘कैलासा जा’.”

या पोस्टवर टीका करताना राम कदम म्हणाले, “शाह यांनी असं का म्हटलं? कोणी त्यांना पाकिस्तानमध्ये जायला सांगितलं? कैलासा हे आमचं पवित्र स्थान आहे. हे भगवान शंकरांचं स्थान आहे. नसीरुद्दीन शाह कैलासाची तुलना पाकिस्तानशी का करत आहेत? ते पुढे म्हणाले, “त्यांना पहलगामवरील दहशतवादी हल्ला आठवत नाही का? पाकिस्तान हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे, हे त्यांना माहीत नाही का? शाह यांचं पाकिस्तानप्रेम भारतापेक्षा मोठं आहे का? ज्यांनी दहशतवादी हल्ल्यांत आपले कुटुंबीय गमावले आहेत, त्यांच्यासाठी कधी शाह यांनी एक शब्दही उच्चारला आहे का?”

राम कदम म्हणाले, “नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य अपमानास्पद आहे. त्यांनी आपल्या शूर सैनिकांचा अपमान केला आहे, कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत आणि कैलासाच्या पवित्रतेचाही अपमान केला आहे. हे सर्व त्यांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी केलं आहे. त्यांनी यासाठी हात जोडून माफी मागावी.” राम कदम यांनी दिलजीत दोसांझलाही इशारा दिला की, “दिलजीतने अशा लोकांपासून दूर राहावं जे ‘माँ भारती’च्या विरोधात आहेत.

Exit mobile version