मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणारे मराठीच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते का?, असा सवाल भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असून दोनही नेते ५ जुलैच्या मराठी मेळाव्यात एकत्र दिसणार आहेत. तब्बल २० वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार अतुल भातखळकर यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी त्यांच्या एकत्रित येण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दोघांमध्ये फुट का पडली?, याचा जनतेसमोर खुलासा करण्याचे आवाहन केले. विधानभवनातून बाहेर पडल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
मराठीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित येत आहेत असे तुम्हाला वाटते का?, असा सवाल विचारला असता भातखळकर म्हणाले, मराठीच्या मुद्यावरून ठाकरे बंधु एकत्रित येतायेत असे जर लोक म्हणत असतील तर मग मराठीच्या मुद्यावरून ते वेगळे झाले होते का?.
मुळात ते २० वर्षांपूर्वी वेगळे का झाले?, याचा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला आधी खुलासा करावा. त्यांनी जरूर एकत्रित यावे, निवडणुकाही लढवाव्यात. देशात लोकशाही आहे, त्यानुसार कोणी कोणबरोबरही युती करू शकतो. पण, एक गोष्ट नक्की आहे ती म्हणजे, मराठीचे आणि महाराष्ट्राचे हीत हे भारतीय जनता प्रणीत महायुतीच्या हातात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये पूर्णपणे सुरक्षित आहे आणि महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे.
हे ही वाचा :
उद्धव ठाकरेंसोबत राज ठाकरे असतील तर काँग्रेसचा टाटा-बाय बाय?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळले, त्रासही दिला, आता का लाळ ओकताहेत?
नाथन लायन म्हणतो – अजून निवृत्तीचा विचार नाही
लडाखला होणाऱ्या लाभाची कारणे सांगितली पंतप्रधानांनी
ते पुढे म्हणाले, भारतीय जनता प्रणीत महायुती स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका या १०० टक्के जिंकणार. राज्याच्या मराठी जनतेला पूर्ण माहिती आहे की महाराष्ट्र, मराठी आणि मराठी माणसाचे हीत जर कोण जपत असेल तर ते भाजपा आणि महायुती आहे.
मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची भाषा करणारे मराठीच्या मुद्द्यावर वेगळे झाले होते का?. pic.twitter.com/NmNslHgfmM
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 1, 2025
