उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सध्या एकत्रित येण्याची चर्चा आहे. दोनही पक्षांकडून तशी बोलणी सुरू असल्याच्या बातम्या समोर येत आहे. अशातच दोनही पक्षाकडून एकत्रित ५ जुलै रोजी विजयी मोर्चा काढण्यात येणार आहे, तशी घोषणा ठाकरे बंधूंनी केली आहे. दरम्यान, राज ठाकरेंना एकत्रित करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या सुरू असलेल्या धडपडीवर भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित करत टीका केली.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, राज ठाकरे, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले यांनी सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाही, ‘जो बूंद से गई वो हौद से नहीं आती.’
हे ही वाचा :
दुसऱ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज, हरमनप्रीतची पुनरागमनाची शक्यता
टीम इंडियाचा कमबॅक प्लान तयार – एजबेस्टनवर हिसका दाखवण्याची वेळ!
अरब सागरात नौसेनेने जहाजावरील आग आटोक्यात
पाकिस्तानच्या अणु धमकीला घाबरणार नाही
दरम्यान, ५ जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा साजरा करणार आहेत. मुंबईतील वरळी डोम येथे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत, अनिल परब, वरूण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर, अभिजीत पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) July 1, 2025
