27 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरविशेषस्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन

Google News Follow

Related

आज भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग जाणतेपणाने अवलंबला, ज्यांनी अनेक क्रांतिकारकांना शस्त्र पुरवली आणि त्यासाठी अंदमानसारख्या भयानक तुरूंगातील काळ्या पाण्याची सजा देखील भोगली अशा क्रांतिकारक, प्रखर राष्ट्रभक्त, हिंदुत्त्ववादी, विचारवंत, कवी, लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटरवरून अभिवादन करताना स्वातंत्रलढ्यातील महान सेनापती आणि प्रखर राष्ट्रभक्त वीर सावरकरांना त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी नमन. असे म्हटले आहे. ते ट्वीटमध्ये लिहीतात,

आजादी की लड़ाई के महान सेनानी और प्रखर राष्ट्रभक्त वीर सावरकर को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन।

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्वीटरचा आधार घेत सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये सावरकराचे जीवन, समर्पण येणाऱ्या पीढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,

कालापानी की सजा में अंग्रेजों की असंख्य क्रूर यातनाएं भी वीर सावरकर जी के भारत की स्वाधीनता के संकल्प को डिगा नहीं पाई। मातृभूमि के लिए उनकी जीवन तपस्या, त्याग व समर्पण देश की आने वाली पीढ़ियों के लिए एक धरोहर है। आजादी के ऐसे महानायक ‘वीर सावरकर’ की जयंती पर उनके चरणों में नमन।

हे ही वाचा:

महाराष्ट्रातील सत्ताधार्‍यांच्या आदेशानेच पोलिसांची गुंडगिरी

भाजपाचा शिवसेनेला ‘दे धक्का’, माथेरानमध्ये १० नगरसेवक फोडले

टाळेबंदीमुळे वाहनचालक-मालकांचा उत्पन्नाचा मार्ग बंद

मराठा आरक्षण हातून गेल्यानंतर ठाकरे सरकारकडून सबबींचा पाढा

त्यांच्या सोबतच केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील सावरकारांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन केले आहे. त्यांनी ट्वीट करताना म्हटले आहे,

स्वातंत्र्य वीर सावरकर जी के जन्मदिवस के अवसर पर, उन महान तपस्वी को मेरा नमन। संघर्ष करते हुए भी मातृभूमि के लिये उनका प्रेम अडिग रहा। उनके जीवन की कहानी देश के युवाओं के लिये हमेशा पथ प्रदर्शक का कार्य करती रहेगी।

महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीटरवरून सावरकरांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. त्यांनी एक व्हिडिओ या निमित्ताने ट्वीट केला आहे.

भाजपाचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटरवरून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन केले आहे. त्यांनी ट्वीट करताना सावरकरांच्या ‘तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण…’ या पंक्तींचा आधार घेतला आहे. ते म्हणतात,

तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण… अंदमानच्या काळकोठडीत ११ वर्षे काळ्यापाण्याची शिक्षा भोगणारे; क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान; प्रखर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते, लेखक, कवी, नाटककार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा