24 C
Mumbai
Monday, January 26, 2026
घरविशेषनेव्ही नगर रायफल चोरी : नक्षलवाद्यांशी कनेक्शन!

नेव्ही नगर रायफल चोरी : नक्षलवाद्यांशी कनेक्शन!

रायफल नक्षलवाद्यांना विकण्याच्या होते तयारीत

Google News Follow

Related

कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरातून इन्सास रायफलची चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनाही तेलंगणातील नक्षलग्रस्त भागातून ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे दोघे चोरलेली रायफल नक्षलवाद्यांना विकण्याच्या तयारीत होते, असा संशय पोलिसांना आहे.

नेव्ही नगरमधून रायफलची चोरी
मुंबईतील कुलाबा भागात नेव्ही नगर आहे. हे क्षेत्र अतिशय सुरक्षित मानले जाते. या परिसरातून इन्सास रायफल आणि तीन भरलेल्या मॅगझिनची चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश दुबला आणि उमेश दुबला अशी अटक करण्यात आलेल्या दोन भावांची नावे आहेत. यातील उमेश दुबला हा कोची येथे नौदलात खलाशी म्हणून काम करत असल्याची माहितीही समोर आली आहे.

४ सप्टेंबर रोजी हे दोघे भाऊ मुंबईत आले होते आणि त्यांनी दोन दिवस नेव्ही नगर परिसरात रेकी केली होती. ६ सप्टेंबर रोजी उमेशने ‘क्यूआरटी’ (Quick Reaction Team) चा गणवेश घातला आणि तो नेव्ही नगरमध्ये गेला. त्याने ड्युटीवर असलेल्या एका जवानाला ‘हाय अलर्ट’ असल्याचे सांगून त्याची इन्सास रायफल, ३ मॅगझिन आणि ४० जिवंत काडतुसे घेतली आणि त्याला हॉस्टेलवर जाण्यास सांगितले.

सहा तासांच्या ड्युटीनंतर ‘रिलीवर’ आला असेल असे समजून त्या जवानाने आपल्याकडील रायफल आणि दारूगोळा त्याच्याकडे सुपूर्द केला. थोड्याच वेळाने तो जवान विसरलेले घड्याळ घेण्यासाठी ड्युटीच्या ठिकाणी परत आला तेव्हा त्याला कोणीच दिसले नाही. त्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.

हे ही वाचा : 

‘संविधान पुनर्लेखन करा, ३ दशकांच्या लुटीची चौकशी करा’

रायबरेलीत राहुल, अखिलेश आणि तेजस्वींचे ‘कलयुगचे ब्रह्मा-विष्णू-महेश’ म्हणून पोस्टर!

झारखंड येथून आयसिसचा संशयित दहशतवादी अटकेत!

नेव्ही नगरातून इन्सास रायफल चोरलेले दोघे भाऊ तेलंगणातून अटकेत

 

नक्षलवादी कनेक्शनचा संशय
या घटनेची गांभीर्याने दखल घेत मुंबई गुन्हे शाखा, एटीएस, एनआयए आणि नौदल पोलिसांनी तपास सुरू केला. काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्यानंतर मुंबई गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तेलंगणाच्या दिशेने रवाना झाले. मंगळवारी रात्री गुन्हे शाखेच्या पथकाने राकेश आणि उमेश या दोघांना तेलंगणातील नक्षलग्रस्त भागातून अटक केली. त्यांच्याकडून चोरलेली इन्सास रायफल आणि मॅगझिन जप्त करण्यात आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, हे दोघे चोरलेली रायफल नक्षलवाद्यांना विकणार होते, असा पोलिसांना संशय आहे. या दिशेने पुढील तपास सुरू आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा