28 C
Mumbai
Wednesday, December 17, 2025
घरविशेष‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’

‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’

अमेरिकेच्या शस्त्रास्रे रोखण्याच्या धमकीवर नेतन्याहू यांचा निर्धार

Google News Follow

Related

‘इस्रायलला एकटे लढण्यास भाग पाडले गेले तर, तर तो एकट्याने लढेल,’ असा निर्धार इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केला आहे. इस्रायलने गाझा पट्टीच्या दक्षिणेकडील राफा शहरावर ताबा मिळवल्यानंतर अमेरिकेने शस्त्रसाठ्याचा पुरवठा रोखण्याचा इशारा दिला होता. त्यावर नेतान्याहू यांनी आपण मागे हटणार नाही, हेच जणू सूचित केले आहे.

‘इस्रायलचा, एकमात्र ज्यू राष्ट्राचा पंतप्रधान म्हणून मी आज जेरुसलेममधून, या होलोकॉस्ट स्मरण दिनानिमित्त वचन देतो, जर इस्रायलला एकटे पाडले गेले, तर इस्रायल एकटा उभा राहील. परंतु आम्हाला माहीत आहे की आम्ही एकटे नाही, कारण जगभरातील असंख्य सभ्य लोक आमच्या न्याय्य कारणाचे समर्थन करतात आणि मी तुम्हाला सांगतो की आम्ही आमचा नरसंहार करणाऱ्या शत्रूंचा पराभव करू,’ असे नेतान्याहू यांनी स्पष्ट केले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी राफावर केलेल्या हल्ल्यासाठी अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणार नाही, असे सांगितल्यानंतर नेतन्याहू यांनी राष्ट्राला संबोधित केले.

हे ही वाचा:

‘२,९०० पीडित आहेत कुठे?’

रतलाममधील काँग्रेस उमेदवार म्हणतो, दोन बायका असतील तर देऊ दोन!

लाच म्हणून मागितला मोबाईल फोन; महिला पोलीस अधिकारी जाळ्यात

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

इस्रायलच्या वार्षिक होलोकॉस्ट स्मृतीदिनानिमित्त नेतान्याहू यांनी धगधगते भाषण केले. ‘८० वर्षांपूर्वी ज्यू लोकांना, जेव्हा निराधार सोडण्यात आले तेव्हा कोणत्याही राष्ट्राने त्यांच्या देशाला मदत केली नाही. ८० वर्षांपूर्वी, होलोकॉस्टमध्ये, ज्यू नागरिक पूर्णपणे असुरक्षित होते. कोणतेही राष्ट्र आमच्या मदतीला आले नाही. आज आम्ही पुन्हा आमच्या विनाश करू पाहणाऱ्या शत्रूंचा सामना करत आहोत. मी जगाच्या नेत्यांना सांगतो, कोणत्याही दबावाचा, कोणत्याही आंतरराष्ट्रीय मंचाचा कोणताही निर्णय इस्रायलला स्वतःचा बचाव करण्यापासून रोखू शकणार नाही,’ असे म्हणाले.

नेतान्याहू पुढे म्हणाले, ‘जर आम्हाला हा लढा एकट्याने लढावा लागला, तर तो आपण एकट्याने लढू. गरज पडल्यास आम्ही आमच्या नखांनी लढू. परंतु आमच्याकडे नखांपेक्षा बरेच काही आहे.”गाझा पट्टीमध्ये गेल्या सात महिन्यांपेक्षा अधिक काळापासून भीषण युद्ध सुरू आहे. आता इस्रायलने गाझाच्या दक्षिणेला असणाऱ्या राफामध्ये हल्ला केला आहे. हा लढा सुरू ठेवण्यासाठी आपल्याकडे पुरेसा शस्त्रसाठा असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा