26 C
Mumbai
Tuesday, February 10, 2026
घरविशेषलोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर चुकीची तारीख

लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर चुकीची तारीख

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांच्या ११८ खासदारांची स्वाक्षरी

Google News Follow

Related

काँग्रेसने लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव लोकसभा सचिवालयाकडे सादर केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या तीव्र संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या खासदारांनी हा अविश्वास प्रस्ताव दाखल केला. काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी सांगितले की, ही नोटीस दुपारी १.१४ वाजता लोकसभेच्या कार्यसंचालन आणि प्रक्रिया नियमांतील नियम ९४ सी अंतर्गत सादर करण्यात आला. या प्रस्तावावर सुमारे ११८ खासदारांच्या सह्या आहेत.

काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे की, इतक्या मोठ्या संख्येने खासदारांचा पाठिंबा मिळणे हे लोकसभेच्या कार्यपद्धतीबाबत विरोधकांमध्ये असलेल्या तीव्र असंतोषाचे द्योतक आहे. त्यांचा आरोप आहे की, सभागृहात विरोधी खासदारांना बोलण्याची पुरेशी संधी दिली जात नाही, सतत व्यत्यय आणले जात आहेत आणि अध्यक्षांच्या भूमिकेत पक्षपात दिसून येत आहे. मात्र, काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही. पक्षाचे म्हणणे आहे की, संसदीय मर्यादा आणि संस्थात्मक परंपरांचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. विरोधी पक्षनेत्याने लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी करणे योग्य मानले जात नाही, जरी सभागृहाच्या कारभाराबाबत विरोधकांच्या गंभीर तक्रारी असल्या तरीही.

काँग्रेस खासदार मणिकम टागोर यांनी मंगळवारी (१० फेब्रुवारी) सांगितले की, विरोधकांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस दिली असून, हे असामान्य परिस्थितीत उचललेले असामान्य पाऊल असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांनी म्हटले की, विरोधक अजूनही घटनात्मक मर्यादांवर विश्वास ठेवतात आणि अध्यक्षांविषयी वैयक्तिक आदर कायम आहे. मात्र, सभागृहात सातत्याने विरोधी खासदारांना जनहिताचे मुद्दे मांडण्यापासून रोखले जात असल्यामुळे तीव्र वेदना आणि असंतोष निर्माण झाला आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या अशा तक्रारींनंतर हा प्रस्ताव आणण्यात आला असून, यामुळे विरोधकांच्या चिंतेची गांभीर्य स्पष्ट होते.

हे ही वाचा:

डिजिटल दहशतीचे नवे रूप; बिश्नोई गँगचे पोलिसांसमोर आव्हान

“राजकीय लढाया न्यायालयात लढू नका”

घसरणीनंतर गुंतवणूकदारांची जोरदार खरेदी

बांगलादेशातील अल्पसंख्यकांसाठी १५ देशांतील हिंदू एकटवले!

दरम्यान, या अविश्वास प्रस्तावामध्ये एक मोठी त्रुटी असल्याचेही सांगितले जात आहे. काँग्रेस खासदारांनी सादर केलेल्या या अविश्वास प्रस्तावात आरोपांची तारीख २०२५ अशी नमूद करण्यात आली आहे. याआधी ४ फेब्रुवारी २०२६ रोजी लोकसभेत झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना पत्र लिहिले होते. या पत्रात विरोधी खासदारांविरोधात नियमांनुसार शक्य ती सर्वात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा