तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…

काँग्रेस सरकारवर होतेय टीका

तेलंगणात शिवरायांच्या पुतळ्यावर प्लास्टिक टाकत अनावरण रोखले, पण वारा आला आणि…

१९ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यासह देशभरात ‘शिवजयंती’ पार पडली. शिवजयंतीनिमित्त विविध संघटनांकडून राज्यभरात मिरवणुका, स्पर्धा, विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंतीमध्ये शिवभक्तांचा उत्साह पाहायला मिळाला. याच दरम्यान, तेलंगणामधून एक बातमी समोर आली आहे. शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार होते. मात्र, पोलिसांनी ते होवू दिले नाही आणि पुतळा प्लास्टिकने झाकून टाकला. मात्र, अचानक सोसाट्याचा वारा आला आणि शिवरायांच्या पुतळ्यावरील प्लास्टिक अलगद उडून गेले आणि एकप्रकारे उद्घाटन झाले.

कॅमरामध्ये कैद झालेली ही घटना सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवरायांचा पुतळा प्लास्टिकने झालेला दिसत आहे आणि सभोवताली भगव्या रंगाच्या पताका-झेंडे लावलेले दिसत आहेत. पोलिसांनी पुतळ्याचे अनावरण रोखल्याने अनेकांची गर्दीही दिसून येत आहेत.

याच दरम्यान, अचानक जोराचा वार येतो आणि पुतळ्यावरील झाकेलेले प्लास्टिक अलगद निघून पडते. एखाद्या चित्रपटामध्ये घडणाऱ्या घटनेसारखेच हे दृश्य होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील प्लास्टिक उडून पडताच उपस्थित स्थानिकांनी एकच जल्लोष केला. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने म्हटले, छत्रपती शिवाजी महाराज आहेत ते त्यांना कोणीच अडवू शकत नाही. तर शिवरायांचा पुतळा झाकल्या प्रकरणी अनेकांनी काँग्रेसवर टीका केली आहे.

हे ही वाचा : 

‘महाकुंभ’ बद्दल वादग्रस्त बोलणाऱ्याचा मोदींनी घेतला समाचार

उत्तर प्रदेश: गुलनाज आणि सरफराजने स्वीकारला सनातन धर्म, ११ आणि ३ हजारांचा मिळाला धनादेश!

रोजच्या खाण्यात १० टक्के कमी तेल वापरा, लठ्ठपणा कमी करा!

राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

खरेतरं, शिवजयंती देशभरात साजरी केली जाते. मात्र, अनेक अशी राज्य आहेत ज्याठिकाणी शिवजयंती साजरी करण्यासाठी परवानगी मागावी लागते. यावरून अनेक वेळा परवानगी नाकारल्याचेही समोर आले आहे, वाद निर्माण केला गेला आहे. जास्त करून, कर्नाटका, तेलंगाना आणि  तमिळनाडू अशा राज्यांमधून शिवजयंतीला विरोध केल्याचे दरवेळी निदर्शनास येते. शिवजयंती साजरी करणाऱ्यांवर दगडफेक, मारहाण केल्याचेही समोर आले आहे.

विशेष म्हणजे, कर्नाटकातील हत्तरगी येथील मणगुत्ती या गावातील बसवलेला शिवरायांचा पुतळा रातोरात उचलण्यात आला होता. यानंतर बरेच आंदोलने, निदर्शेन झाली. मात्र, कर्नाटक सरकारने अद्याप यावर कोणतेच भाष्य केलेले नाही. पुतळ्याची ती जागा अजूनही रिकामीच आहे. गावकऱ्यांनी शिवरायांचा पुतळा एका बंद खोलीत ठेवला आहे. याठिकाणी दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवजयंतीला मराठी भाषिकांनी शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालत पूजा केली आणि शिवजयंती साजरी केली. कर्नाटक-महाराष्ट्र सरकारने यावर काहीतरी तोडगा काढून शिवरायांचा पुतळा बसवावा, अशी मागणी मराठी भाषिक करत आहेत.

Exit mobile version