उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये दोन मुस्लिम तरुणांनी सनातन धर्म स्वीकारला आहे. मुस्लिम धर्मातून हिंदू धर्मात धर्मांतरित झालेल्या दोन्ही तरुणांना सनातन धर्मात आणण्यात ठाकूर जितेंद्र नारायण सिंह सेंगर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार त्यांनी सनातन धर्म स्वीकारणाऱ्या दोनही मुस्लिम तरुणांना धनादेश देत आपले आश्वासन पूर्ण केले आहे.
लखनौमधील मनकामेश्वर मंदिरात ठाकूर जितेंद्र नारायण सिंह सेंगर यांच्या उपस्थितीत दोन्ही तरुणांनी सनातन धर्म स्वीकारला. यानंतर त्यांनी दोनही तरुणांना शुभेच्छा म्हणून ११ हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच ३ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. दरम्यान, उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी ३ वर्षांपूर्वी इस्लाम सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर वसीम रिझवी हे ठाकूर जितेंद्र नारायण सिंह सेंगर बनले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी हे नाव दिले होते.
ठाकूर जितेंद्र नारायण सिंह सेंगर म्हणाले की, बिजनौर येथील रहिवासी सरफराज अहमद (४०) आणि शाहजहानपूर येथील रहिवासी गुलनाज (३२) यांनी मुस्लिम समुदायातील द्वेष आणि कट्टरता मागे टाकून सनातन धर्म स्वीकारला आहे. ते पुढे म्हणाले, दोघांनाही नवी नावे देण्यात आली आहेत. सरफराज अहमदचे नाव आता राजन मिश्रा आणि गुलनाजचे नाव विराट मिश्रा असे ठेवण्यात आले आहे. इथून पुढे समाज आता त्यांना याच नावांनी ओळखेल. सध्या ही संख्या दोनवर आहे. लवकरच ही संख्या दोन लाखांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हे ही वाचा :
रोजच्या खाण्यात १० टक्के कमी तेल वापरा, लठ्ठपणा कमी करा!
उन्नाव : तौहीद अलीने १९ वर्षीय मुलीची केली निर्घृण हत्या
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून
राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसला रवाना
हिंदू धर्म स्वीकारलेल्या राजन मिश्राने (सरफराज अहमद) म्हटले की, लॉकडाऊन दरम्यानच इस्लाम धर्म सोडला होता. इस्लाममध्ये अशा अनेक गोष्टी हराम आहेत, ज्या स्वतः स्वीकारल्या नाहीत. हिंदू धर्म निसर्गाशी जोडला आहे. या ठिकाणी पृथ्वी आणि पाण्याचीही पूजा केली जाते. त्यामुळे हिंदू धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, असे राजन मिश्राने सांगितले. तर विराट मिश्राने ( गुलनाज ) सांगितले की, इस्लाममध्ये महिलांना योग्य आदर दिला जात नाही. सनातन धर्म हा महान आहे आणि मी सर्वांना तो स्वीकारण्याचे आवाहन करतो.