26 C
Mumbai
Tuesday, March 18, 2025
घरविशेषविधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून

१० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

Google News Follow

Related

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सोमवार, ३ मार्च ते बुधवार, २६ मार्च या कालावधीत होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे.

विधानभवन मुंबई येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक रविवारी झाली. यावेळी अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीष महाजन, शंभुराज देसाई, आमदार सर्वश्री प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, अनिल परब, हेमंत पाटील, श्रीकांत भारतीय, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, डॉ.नितीन राऊत, रणधीर सावरकर, अमिन पटेल, विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे, सचिव विलास आठवले यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या होत्या.

हेही वाचा..

राज्यातील १२ किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसा दर्जा मिळवण्यासाठी शिष्टमंडळ पॅरिसला रवाना

यूएसएआयडी निधीची चौकशी सुरु

१२ वर्षीय यश १५ हजार किमी सायकल चालवून महाकुंभात सहभागी!

डावे ढोंगी, आमच्यावर चिखलफेक करतायत

अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार, ८ मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर १३ मार्च रोजी होळी निमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा