महाकुंभ संगमात लाखो भाविक सहभागी होत आहेत. २६ फेब्रुवारी रोजीच्या महाशिवरात्रीच्या प्रमुख स्नानानंतर महाकुंभाचा शेवट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल होत आहे. आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले आहे. याच दरम्यान, प्रयागराजमध्ये पोहोचलेल्या १२ वर्षीय मुलाची चर्चा होत आहे.
दिल्लीतील १२ वर्षांचा यश १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी सायकलवरून निघाला आहे. या प्रवासादरम्यान तो प्रयागराज महाकुंभात पोहोचला. आतापर्यंत त्याने सुमारे १५ हजार किमी प्रवास केला आहे. महाकुंभात पाच दिवस राहिल्यानंतर, यशने संगमात स्नान केले आणि येथील प्रमुख मंदिरांना भेट दिली.
एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, शाळेत एका मुलाने हिंदू धर्माबाबत मला शिवीगाळ केली होती. त्यामुळे मी त्याला मारहाण केली. यामुळे माझे नाव शाळेतून काढून टाकण्यात आले. त्यानंतर चुकीचे काम न करण्याचे ठाणले आणि योग्य मार्गावर निघण्यासाठी बाहेर पडलो.
हे ही वाचा :
महाकुंभ : २६ फेब्रुवारीला शेवट, ६० कोटींहून अधिक भाविकांचे स्नान!
हमासच्या दहशतवाद्यांचे चुंबन घेणारा इस्रायली ओलिस म्हणाला, तसे करण्यास सांगितले होते!
कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राने कर्नाटकला जाणारी बससेवा केली बंद!
‘छावा’ चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय !
तो पुढे म्हणाला, याच दरम्यान माझ्या मनात १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्याचा विचार आला. यासाठी सायकल वरून जाण्याचा निर्धार केला. सायकलवरून प्रवास असल्याने आई-बाबांनी यासाठी नकार दिला. मात्र, मी कोणाचेही न ऐकता मी सायकल घेवून बाहेर पडलो.
१२ ज्योतिर्लिंगांच्या प्रवासाला आज मला ९ महिने १७ दिवस उलटून गेले आहेत. मी महाराष्ट्रातून महाकुंभात पोहोचलो आहे. येथून मी रामेश्वरमला जाईन आणि नंतर ओडिशाला जाईन. पवित्र अमरनाथ गुहेला भेट दिल्यानंतर ही सायकल यात्रा पूर्ण होईल, असे यशने सांगितले. दरम्यान, यशच्या प्रवासाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्याच्या प्रवासाची जोरदार चर्चा होत आहे.
विद्यालय में यश हिंदू धर्म को दी गई गाली सहन नहीं कर सके। इसलिए पढ़ाई छूट गई। स्कूल से नाम कटा तो देश भर के तीर्थों का भ्रमण करने निकल पड़े।
ईश्वर उनकी रक्षा करे और माता सरस्वती भी अपनी कृपा बनाए। आशा है यात्रा समाप्त कर यश एक नई ऊर्जा के साथ अपना अध्ययन पुनः आरंभ करेंगे। pic.twitter.com/4auWWPswjC— Rajan Kumar Jha (@RealRajanjha) February 21, 2025