१३ जानेवारी पासून प्रयागराजमध्ये सुरू झालेल्या महाकुंभात आतापर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांनी गंगा आणि त्रिवेणी संगमात स्नान केले आहे. उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी (२२ फेब्रुवारी) ही माहिती दिली. महाकुंभ मेळा प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी ४ वाजेपर्यंत एकूण १.११ कोटींहून अधिक भाविकांनी गंगा आणि संगममध्ये स्नान केले, तर १३ जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०.४२ कोटी भाविकांनी गंगा आणि संगममध्ये स्नान केले आहे.
महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. २६ फेब्रुवारी शेवटचे स्नान असणार आहे. या पवित्र स्नानासाठी अवघे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी संगमात स्नान केले असून शेवटच्या दिवसापर्यंत हा आकडा ६५ कोटींवर जाण्याचा आशा व्यक्त केली जात आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी शनिवारी संगममध्ये स्नान केले. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक, राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंह आणि मंत्री नंद गोपाल गुप्ता यांनी देखील संगमात स्नान केले. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या मंत्र्यांसोबत स्नान केल्यानंतर, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या कुटुंबासह संगमात स्नान केले. त्यांनी गंगा मातेला साडी, नारळ, फुले इत्यादी अर्पण केले. यादरम्यान, जेपी नड्डा आणि त्यांच्या कुटुंबाने संगममध्ये किलबिलाट करणाऱ्या सायबेरियन पक्ष्यांनाही खाऊ घातला.
हे ही वाचा :
हमासच्या दहशतवाद्यांचे चुंबन घेणारा इस्रायली ओलिस म्हणाला, तसे करण्यास सांगितले होते!
कन्नड समर्थक कार्यकर्त्यांच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राने कर्नाटकला जाणारी बससेवा केली बंद!
‘छावा’ चित्रपटाने औरंगजेबाच्या कबरीलाच आव्हान दिलंय !
पवारांच्या ‘त्या’ कर्तृत्त्वाचा सूत्रधार कोण होता ?
दरम्यान, २६ फेब्रुवारी रोजी महाकुंभ मेळा संपणार असल्याने भाविक प्रयागराजमध्ये गर्दी करत आहेत. भाविकांच्या संख्येमध्ये वाढ होणार असल्याने प्रशासनकडून खबरदारी घेतली जात आहेत.